सुक्ष्म, लघु आणि मध्यम उदयोग मंत्रालय
पोंडुरू खादीला मिळाले भौगोलिक मानांकन, खादी आणि ग्रामोद्योग आयोग कारागीरांचा सत्कार करणार आणि जागतिक बाजारपेठेतील पोहोच वाढवणार
पोंडुरू खादीचे भौगोलिक मानांकन, या वस्त्राला जागतिक ओळख मिळवून देण्याबरोबरच बाजारपेठेतील प्रवेशाला चालना देणार
प्रविष्टि तिथि:
16 JAN 2026 9:32PM by PIB Mumbai
मुंबई,16 जानेवारी 2026
पोंडुरू खादीला ‘जीआय’ टॅग मिळाल्याबद्दल सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयाच्या खादी आणि ग्रामोद्योग आयोगाचे (केव्हीआयसी) अध्यक्ष मनोज कुमार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहेत. त्यांनी शुक्रवारी याबाबतचे निवेदन जारी केले. भारताच्या पारंपरिक खादी उत्पादनांना राष्ट्रीय आणि जागतिक स्तरावर मान्यता मिळवून देण्यासाठी खादी आणि ग्रामोद्योग आयोग सतत प्रयत्नशील असून, या उल्लेखनीय कामगिरीबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.

पोंडुरू खादीला जीआय टॅग मिळणे ही संपूर्ण खादी क्षेत्रासाठी अभिमानाची बाब असल्याचे मनोज कुमार यांनी म्हटले आहे. ही ओळख, केवळ या असामान्य कापडाच्या अस्सलपणाचे रक्षण करत नाही, तर पिढ्यानपिढ्या ही पारंपरिक हस्तकला जतन करणाऱ्या कारागिरांच्या योगदानाचाही सन्मान करत असल्याचे त्यांनी नमूद केले.

या कापडाच्या वैशिष्ट्याबद्दल अधिक माहिती देताना केव्हीआयसीच्या अध्यक्षांनी स्पष्ट केले की, पोंडुरू खादी हे आंध्र प्रदेशातील श्रीकाकुलम जिल्ह्यातील पोंडुरू या गावात पारंपरिक पद्धतीने हातमागावर विणले जाणारे सुती कापड आहे.स्थानिक पातळीवर ते 'पटनुलू' या नावाने ओळखले जाते. ते पुढे म्हणाले की, पोंडुरू खादी हे कापड, सुमारे 100–120 इतक्या धाग्यांनी विणले जात असून, या अपवादात्मक गुणवैशिष्टयामुळे ते दर्जेदार समजले जाते.
मनोज कुमार म्हणाले की, जीआय टॅगमुळे पोंडुरू खादीला राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळेल, त्यामुळे कारागिरांचे उत्पन्न वाढेल आणि रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होतील. त्यांनी पुढे सांगितले की, जीआय नोंदणीनंतर,पोंडुरू खादीला आता बनावट उत्पादनांपासून कायदेशीर संरक्षण मिळेल, ग्राहकांना अस्सलतेची खात्री मिळेल, आणि कारागीरांचे श्रम आणि कौशल्याला योग्य मोल मिळेल.
शैलेश पाटील/राजश्री आगाशे/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2215487)
आगंतुक पटल : 26