रेल्वे मंत्रालय
सामानासाठी मुबलक जागा, सुव्यवस्थित ‘बर्थ’रचना, अत्याधुनिक आणि प्रशस्त शौचालय इत्यादी सुविधांनी सुसज्ज पहिली ‘वंदे भारत शयनयान’ रेलगाडी लवकरच होणार सुरू
प्रविष्टि तिथि:
14 JAN 2026 11:28PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 14 जानेवारी 2026
भारतीय रेल्वे आपल्या आधुनिकीकरणाच्या प्रवासात आणखी एक महत्त्वाचा टप्पा गाठण्यासाठी सज्ज होत आहे. वंदे भारत एक्स्प्रेसची शयनयान आवृत्ती असलेल्या रेल्वेगाडीमुळे भारतातील लांब पल्ल्याचा रात्रीचा रेल्वे प्रवास सामान्य प्रवाशांसाठी अधिक वेगवान, सुरक्षित आणि अधिक आरामदायी होणार आहे. आजच्या युगातील प्रवाशांच्या बदलत्या अपेक्षांनुसार रात्रीचा प्रवास केवळ गंतव्य स्थान गाठण्याचे माध्यम म्हणून नाही, तर एक आल्हाददायक अनुभव ठरण्यासाठी ‘वंदे भारत स्लीपर ट्रेन’ची रचना करण्यात आली आहे. याद्वारे आधुनिक तंत्रज्ञान, सुधारित सुरक्षा वैशिष्ट्ये आणि प्रवासीस्नेही सुविधा यांचा संगम साधून परवडणाऱ्या भाड्यात उत्कृष्ट दर्जाचा आरामदायी प्रवास अनुभव उपलब्ध करून देण्यात आला आहे.

पहिली वंदे भारत शयनयान गाडी आसाममधील गुवाहाटी ते पश्चिम बंगालमधील हावडा दरम्यान पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन धावणार आहे; यामुळे देशातील लांब पल्ल्याच्या रात्रीच्या रेल्वे प्रवासात एक परिवर्तनकारी पाऊल उचलले जाईल. या मार्गावर वंदे भारत स्लीपर ट्रेन ची सुरुवात करुन भारतीय रेल्वे सदैव आधुनिक आणि प्रवासी-केंद्रित सेवांवर भर देत असल्याचे दिसून येते. हा उपक्रम म्हणजे भविष्याच्या दिशेने टाकलेले एक पाऊल आहे, जिथे रेल्वे प्रवास वेग, आराम आणि सुरक्षा यांचा संगम साधून देशभरातील लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी रेल्वेला प्राधान्य दिले जाईल.

प्रवाशांसाठी आरामदायक आणि जागतिक दर्जाच्या सुविधा
विशेषत्वाने लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी तयार केलेल्या वंदे भारत शयनयान गाडीची रचना प्रवाशांचा आरामदायी प्रवास व्हावा हा उद्देश केंद्रस्थानी ठेवून केली आहे. या ट्रेनमध्ये एकूण 16 अत्याधुनिक डबे असतील आणि या गाडीची एकूण प्रवासी क्षमता सुमारे 823 असेल, एकंदर ही गाडी वेग, जागा आणि आराम यांचा निरंतर अनुभव देईल.

मानक शारीरिक रचनेचा विचार करून डिझाइन केलेल्या बर्थमुळे शरीराला आवश्यक आधार मिळेल आणि त्यामुळे रात्रीचा प्रवास अधिक आरामदायक होईल. स्वयंचलित दरवाज्यांमुळे एका डब्यातून दुसऱ्या डब्यात जाणे सुरक्षित तर होईलच शिवाय सहज हालचाल शक्य होणार आहे. गाडीला आधुनिक सस्पेंशन बसविल्यामुळे प्रवासाच्या गुणवत्तेत अधिक सुधारणा होणार आहे. कारण प्रवाशांना जोरदार धक्के बसणे कमी होईल आणि कंपनेही कमी होतील, त्यामुळे प्रवास शांत आणि थकवा विरहित होण्यास मदत मिळेल.


सामान ठेवण्यास पुरेशी जागा, सुव्यवस्थित आरेखन केलेले बर्थ, अत्याधुनिक आणि प्रशस्त स्वच्छतागृहे यांनी सुसज्ज असलेली पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन लवकरच सुरू होणार.

वंदे भारत स्लीपर गाड्यांमध्ये भरपूर आणि सुव्यवस्थित सामान ठेवण्याची जागा उपलब्ध आहे, ज्यामध्ये लहान पिशव्यांसाठी ओव्हरहेड रॅक आणि बर्थखाली जागा तसेच मोठ्या सुटकेससाठी कोचच्या प्रवेशद्वाराजवळ समर्पित जागा आहेत ज्यामुळे आतील भाग नीटनेटका आणि आरामदायी राहतो. लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी आरेखित केलेल्या या रेल्वेगाड्यांमध्ये एर्गोनॉमिक स्लीपर बर्थ, यूएसबी चार्जिंग पोर्ट आणि वर्धित सुरक्षा प्रणाली आहे. दिव्यांगजनांसाठी अनुकूल जागा, मॉड्यूलर भोजनयान आणि प्रगत अग्निसुरक्षा प्रणाली यांसारख्या सुविधांमुळे प्रवाशांच्या सोयीमध्ये आणखी भर पडेल, ज्यामुळे रात्रीच्या प्रवासाचा सुरक्षित, कार्यक्षम आणि आधुनिक अनुभव मिळू शकेल.
स्वच्छ, आरोग्यदायी आणि आरोग्यस्नेही प्रवास
वंदे भारत स्लीपरच्या अनुभवामध्ये स्वच्छता आणि आरोग्याचे उच्च दर्जाचे मापदंड समाविष्ट करण्यात आले आहेत.

परवडणारा प्रीमियम प्रवास
वंदे भारत स्लीपरचे एक प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे हवाई प्रवासाच्या तुलनेत त्याची किफायतशीरता.
प्रवासात प्रादेशिक चवींचा आनंद
प्रवाशांना उच्च-गुणवत्तेच्या ऑनबोर्ड खानपान सेवांचाही आनंद घेता येईल, ज्यामुळे रात्रीचे लांब प्रवास अधिक आरामदायी होतील.
स्वदेशी तंत्रज्ञानाद्वारे सुरक्षितता
सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य आहे. वंदे भारत स्लीपर ट्रेन स्वदेशी 'कवच' या स्वयंचलित रेल्वेगाडी संरक्षण प्रणालीने सुसज्ज आहे, जी टक्कर टाळण्यात आणि सुरक्षित परिचालन सुनिश्चित करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावते.

निलीमा चितळे/सुवर्णा बेडेकर/भक्ती सोनटक्के/नंदिनी मथुरे/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2214763)
आगंतुक पटल : 9