प्रविष्टि तिथि:
14 JAN 2026 5:35PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 14 जानेवारी 2026
नीती आयोगाने निर्यात सज्जता निर्देशांक (ईपीआय) 2024 जारी केला. ईपीआय हा भारतातील राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील निर्यात सज्जतेचे सर्वसमावेशक मूल्यांकन आहे. हा निर्देशांक राज्य स्तरीय आर्थिक संरचनांची विविधता आणि भारताच्या जागतिक व्यापाराच्या महत्त्वाकांक्षा पुढे नेण्यामधील त्याची महत्त्वाची भूमिका ओळखतो. ईपीआयची पहिली आवृत्ती ऑगस्ट 2020 मध्ये प्रकाशित झाली आणि ही चौथी आवृत्ती आहे.
2030 पर्यंत 1 ट्रिलियन अमेरिकन डॉलर्सच्या व्यापारी निर्यातीचे उद्दिष्ट आणि विकसित भारत @2047 च्या दृष्टीकोनाला अनुसरून, निर्यात सज्जता निर्देशांक राज्य स्तरीय निर्यात परिसंस्थेचे सामर्थ्य, लवचिकता आणि समावेशकता, याचे मूल्यांकन करण्यासाठी पुरावा-आधारित चौकट प्रदान करतो. हा निर्देशांक राज्य आणि जिल्हा पातळीवर निर्यात स्पर्धात्मकता वाढवण्यासाठी प्रमुख संरचनात्मक आव्हाने, विकासाचे मार्ग आणि धोरणात्मक संधी ओळखतो.
भारताचा निर्यात प्रवास राज्ये आणि जिल्ह्यांच्या सज्जतेमुळे चांगला आकाराला येत असल्याचे नीती आयोगाच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी यावेळी अधोरेखित केले. निर्यातीच्या पायाभूत सुविधांचे बळकटीकरण, किमतीची स्पर्धात्मकता वाढवणे, मजबूत संस्था तयार करणे आणि अंदाज लावता येण्याजोगे आणि पारदर्शक धोरणाचे वातावरण जोपासणे, यावर भर देण्यात आल्याचे ते म्हणाले. दीर्घकालीन विकास, रोजगार निर्मिती, प्रादेशिक विषमता कमी करणे आणि वाढत्या जागतिक अस्थिरतेदरम्यान जागतिक मूल्य साखळीत एकात्मता कायम राखण्यासाठी उपराष्ट्रीय स्तरावर निर्यात सज्जता वाढवण्यावर भर देण्यात आल्याचे ते म्हणाले. ही गती कायम ठेवण्यासाठी आणि ती वाढवण्यासाठी राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांची भूमिका महत्वाची असून, त्यासाठी स्वतःचे सामर्थ्य ओळखणे, संरचनात्मक तफावत दूर करणे आणि नवीन व्यापार संधींचा लाभ घेण्यासाठी रणनीती तयार करणे आवश्यक असल्याचे सदस्य सदस्य डॉ. अरविंद विरमाणी म्हणाले. स्पर्धात्मकतेसाठी उत्पादनांचा दर्जा वाढवण्याच्या पंतप्रधानांच्या आवाहनाचा डॉ. विरमाणी यांनी पुनरुच्चार केला.
I. चौकट आणि व्याप्ती
निर्यात सज्जता निर्देशांक (ईपीआय) 2024 चार स्तंभांवर आधारित असून, पुढे 13 उप-स्तंभ आणि 70 निर्देशकांमध्ये विभागला आहे. यामुळे निर्यात सज्जतेचे बारकावे आणि धोरण-संबंधित मूल्यांकन शक्य होते.
निर्यात सज्जता निर्देशांक (ईपीआय) 2024 चे आधारस्तंभ:
|
निर्यात पायाभूत सुविधा
|
व्यवसाय परिसंस्था
|
धोरण आणि प्रशासन
|
निर्यात कामगिरी
|
|
व्यापार आणि लॉजिस्टिक पायाभूत सुविधा
|
वित्तीय उपलब्धता
|
राज्य निर्यात धोरण
|
निर्यात परिणाम
|
|
दळणवळण सुविधा आणि उपयुक्तता
|
मानवी भांडवल
|
संस्थात्मक क्षमता
|
निर्यात वैविध्य
|
|
औद्योगिक पायाभूत सुविधा
|
एमएसएमई परिसंस्था
|
व्यापार सुविधा
|
जागतिक एकात्मता
|
II. राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांचे वर्गीकरण
तुलनात्मक मूल्यांकन आणि परस्परांकडून शिकणे, यासाठी राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांचे मोठी राज्ये आणि लहान राज्ये, ईशान्येकडील राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश, असे वर्गीकरण करण्यात आले आहे. प्रत्येक श्रेणीमध्ये, त्यांचे पुढे लीडर्स, चॅलेंजर्स आणि अॅस्पायरर्स म्हणून वर्गीकरण केले आहे.
III. कार्यपद्धती आणि डेटा स्त्रोत
निर्यात सज्जता निर्देशांक 2024 केंद्रीय मंत्रालये, राज्य सरकारे आणि सार्वजनिक संस्थांकडून प्राप्त केलेल्या अधिकृत डेटासेटवर आधारित डेटा-चलित, निर्देशक-आधारित पद्धतीचा अवलंब करतो.
IV. सर्वोत्तम कामगिरी करणारी राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश
ईपीआय 2024 अंतर्गत एकूण मूल्यांकनाच्या आधारे, पुढील राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश, संबंधित श्रेणीमध्ये सर्वोत्तम कामगिरी करणारे म्हणून उदयाला आली आहेत:
सर्वोत्तम कामगिरी- निर्यात सज्जता निर्देशांक (ईपीआय) 2024
अ.मोठी राज्ये
1. महाराष्ट्र
2. तामिळनाडू
3. गुजरात
4. उत्तर प्रदेश
5. आंध्र प्रदेश
ब. लहान राज्ये, ईशान्येकडील राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश
1. उत्तराखंड
2. जम्मू आणि काश्मीर
3. नागालँड
4. दादरा आणि नगर हवेली आणि दमण आणि दीव
5. गोवा
तपशीलवार गुण, निर्देशक-स्तरीय कामगिरी आणि राज्य-निहाय प्रोफाइल, निर्यात सज्जता निर्देशांक (ईपीआय) 2024, अहवालाच्या लिंकमध्ये दिले आहेत.
पूर्ण अहवाल येथे पहावा:
https://niti.gov.in/sites/default/files/2026-01/Export_Preparedness_Index_2024.pdf