कृषी मंत्रालय
केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी दिल्ली येथे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची घेतली भेट
केंद्रीय मंत्री शिवराज सिंह यांनी कृषी आणि ग्रामीण विकासाशी संबंधित विविध पैलूंवर अर्थसंकल्प-पूर्व व्यापक सल्लामसलत केली; सूचनांचा संकलित अहवाल अर्थमंत्र्यांना सादर केला
प्रविष्टि तिथि:
12 JAN 2026 10:04PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 12 जानेवारी 2026
केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण आणि ग्रामीण विकास मंत्री शिवराज सिंह यांनी आज दिल्ली येथे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची भेट घेतली. चौहान यांनी मागील काही आठवड्यांमध्ये देशभरातील विविध राज्यांना भेट दिली तसेच राज्यांव्यतिरिक्त, त्यांनी दिल्लीमध्ये देखील प्रगतीशील शेतकरी, कृषी तज्ञ,बचत गट, सहकारी संस्था, ग्रामीण उद्योग आणि दोन्ही मंत्रालयांशी संबंधित राष्ट्रीय स्तरावरील संस्थांच्या वरिष्ठ प्रतिनिधींशी व्यापक संवाद साधला . या चर्चेतून प्राप्त झालेले विचार आणि सूचना कृषी आणि ग्रामीण विकासावरील शिफारशींच्या एका समग्र संचात संकलित करण्यात आल्या आणि आज त्यांनी त्या अर्थमंत्र्यांना सादर केल्या.
H8M6.jpeg)
केंद्रीय मंत्र्यांनी नमूद केले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकार ग्रामीण भारताला आत्मनिर्भर आणि समृद्ध बनवण्यासाठी निरंतर काम करत आहे. शिवराज सिंह चौहान म्हणाले की, पंतप्रधानांच्या कुशल आणि दूरदर्शी नेतृत्वाखाली, आगामी केंद्रीय अर्थसंकल्प शेतकरी आणि ग्रामीण समुदायांसाठी प्रेरणादायी असेल. आर्थिक वर्ष 2026–27 चा अर्थसंकल्प पंतप्रधानांचा 'समृद्ध शेतकरी, सक्षम गावे' हा संकल्प साकार करण्यात एक मैलाचा दगड ठरेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
LMSX.jpeg)
निलीमा चितळे/सुषमा काणे/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2213984)
आगंतुक पटल : 19