मत्स्योत्पादन, पशुविकास आणि दुग्धविकास मंत्रालय
मत्स्यव्यवसाय आणि मत्स्यपालन क्षेत्रातील क्षमता उभारणीसाठी मत्स्यव्यवसाय विभागाचा पुढाकार
प्रविष्टि तिथि:
10 JAN 2026 1:51PM by PIB Mumbai
राष्ट्रीय मत्स्य शेतकरी दिनानिमित्त आज 10 जुलै 2025 रोजी ओदिशामध्ये भुवनेश्वर इथल्या भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या केंद्रीय गोड्या पाण्यातील मत्स्यपालन संस्थेत (ICAR-CIFA) एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.


यावेळी केंद्रीय मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय आणि पंचायती राज मंत्री राजीव रंजन सिंह (ललन सिंह) यांच्या हस्ते एका दिनदर्शिकेचे अनावरण करण्यात आले. यात भारतीय कृषी संशोधन परिषद आणि त्यांच्या प्रादेशिक केंद्रांच्या प्रशिक्षण आणि क्षमता उभारणी कार्यक्रमासह, राष्ट्रीय मत्स्यव्यवसाय विकास मंडळ आणि भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या संयुक्त प्रशिक्षण, क्षमता उभारणी आणि क्षेत्रीय भेट दिनदर्शिकेचा समावेश आहे. या दिनदर्शिकेच्या माध्यमातून 2025–2027 या कालावधीतील प्रशिक्षण सत्रे, क्षेत्रीय भेटी आणि ज्ञानाच्या देवाणघेवाणीशी संबंधित उपक्रमांचा एक सुनियोजित आराखडा उपलब्ध करून देण्यात आला आहे.
सर्वसमावेशक व्याप्ती आणि अभ्यासक्रम
या कार्यक्रमांअंतर्गत मच्छिमार आणि मत्स्यपालकांचे तांत्रिक कौशल्य वाढवून, वैज्ञानिक पद्धतींचा अवलंब करण्याला प्रोत्साहन दिले जाणार असून, त्या माध्यमातून पर्यावरणपूरक कार्यपद्धती सुनिश्चित करत त्यांच्या सक्षमीकरणाला चालना दिली जाणार आहेत. मत्स्यपालन तंत्रज्ञानात वेगाने होत असलेले आधुनिकीकरण आणि गुणवत्तापूर्ण मत्स्य उत्पादनांची वाढती मागणी लक्षात घेऊन, या नियोजित प्रशिक्षणाअंतर्गत उत्पादनपूर्व, उत्पादन आणि उत्पादनोत्तर अशा सर्व क्षेत्रांचा समावेश करण्यात आला आहे. यात प्रामुख्याने हॅचरी ऑपरेशन्स, प्रगत मत्स्य संगोपन तंत्र, एकात्मिक/संयुक्त मिश्र शेती, माशांच्या आरोग्याचे व्यवस्थापन, खाद्यनिर्मिती, समुद्री शेवाळाची लागवड आणि मूल्यवर्धित मत्स्य प्रक्रिया या विषयांवर भर दिला गेला आहे. त्या अनुषंगानेच विविध प्रशिक्षण कार्यक्रमांमध्ये अल्प मुदतीचे आणि दीर्घ मुदतीचे अभ्यासक्रम, क्षेत्रीय भेटी, कार्यशाळा, परिषदा आणि प्रशिक्षकांसाठीचे प्रशिक्षण अशा घटकांचा अंतर्भाव केला गेला आहे. यामुळे संबंधित भागधारकांना त्यांच्या कामांच्या गरजेनुसार आवश्यक ज्ञान आणि कौशल्ये प्राप्त होतील अशी अपेक्षा आहे.

अर्थसंकल्पीय तरतूद आणि अंमलबजावणी
या संदर्भात, केंद्र सरकारच्या मत्स्यव्यवसाय विभागाने 2.93 कोटी रुपयांच्या राखीव निधीची तरतूद केली आहे. प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना आणि प्रधानमंत्री मत्स्य किसान समृद्धी सह योजने अंतर्गत प्रशिक्षण आणि क्षमता बांधणी कार्यक्रमांसाठीच्या हैदराबाद इथले राष्ट्रीय मत्स्यव्यवसाय विकास मंडळ ही संस्था या उपक्रमाची समन्वयक अंमलबजावणी संस्था म्हणून जबाबदारी पार पाडत आहे. मच्छिमार आणि मत्स्यपालकांच्या प्रशिक्षणाचा संपूर्ण खर्च मत्स्यव्यवसाय विभागामार्फत केला जात आहे.
या उपक्रमाअंतर्गत प्रशिक्षणाची जबाबदारी राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांचे मत्स्यव्यवसाय विभाग, भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या मत्स्य संशोधन संस्था आणि त्यांची प्रादेशिक केंद्रे, कृषी विज्ञान केंद्रे, भारतीय कृषी कौशल्य परिषद (ASCI), केंद्रीय सागरी मत्स्यव्यवसाय आणि अभियांत्रिकी प्रशिक्षण संस्था (CIFNET) आणि राष्ट्रीय मत्स्योत्पादनोत्तर काढणी तंत्रज्ञान आणि प्रशिक्षण संस्था (NIFPHAT) अशा संस्थांद्वारे सांभाळली जात आहे. याअंतर्गत गेल्या सहा महिन्यांत एकूण 499 प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आले असून, एकूण 22,921 सहभागींनी याचा लाभ घेतला आहे. प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेअंतर्गत भागधारकांना आधुनिक पद्धती आणि तंत्रज्ञानाने सुसज्ज करून, मत्स्य शेतकरी, उद्योजक आणि संबंधित समुदायांच्या सक्षमीकरणाचा उद्देश साध्य केला जात आहे, यामुळे अन्न सुरक्षा, पोषण आणि उपजीविकांमधील वृद्धीचीही सुनिश्चिती होत आहे.


भविष्यातील दृष्टिकोन
मत्स्यव्यवसाय विभागाने घेतलेल्या या पुढाकारामुळे भागधारकांच्या सक्षमीकरणासोबतच, मत्स्यव्यवसाय आणि मत्स्यपालन क्षेत्राच्या भविष्यातील प्रगतीचा आणि लवचिकतेसाठीचा एक मजबूत पाया रचला गेला आहे. या उपक्रमामुळे अंतिमतः या क्षेत्रातील सुप्त क्षमतांचा वापर करण्याला, रोजगार निर्मितीला आणि पर्यायाने देशाच्या सामाजिक आर्थिक विकासात योगदानाला मोठी मदत मिळणार आहे.

|
अ. क्र.
|
संस्थेचे नाव
|
प्रशिक्षण कार्यक्रमांची संख्या
|
एकूण सहभागी संख्या
|
|
1
|
भाकृअनुप-केंद्रीय मत्स्यव्यवसाय शिक्षण संस्था (CIFE), मुंबई आणि तिची प्रादेशिक केंद्रे
|
55
|
1830
|
|
2
|
भाकृअनुप-केंद्रीय गोड्या पाण्यातील मत्स्यपालन संस्था (CIFA), भुवनेश्वर आणि तिची प्रादेशिक केंद्रे
|
27
|
737
|
|
3
|
भाकृअनुप-केंद्रीय खऱ्या पाण्यातील मत्स्यपालन संस्था (CIBA), चेन्नई आणि तिची प्रादेशिक केंद्रे
|
31
|
1207
|
|
4
|
भाकृअनुप-केंद्रीय मत्स्यव्यवसाय तंत्रज्ञान संस्था (CIFT), कोची आणि तिची प्रादेशिक केंद्रे
|
55
|
1001
|
|
5
|
भाकृअनुप-केंद्रीय अंतर्देशीय मत्स्य संशोधन संस्था (CIFRI), कोलकाता आणि तिची प्रादेशिक केंद्रे
|
42
|
1776
|
|
6
|
भाकृअनुप-केंद्रीय शीतजल मत्स्य संशोधन संस्था, भीमताल
|
50
|
3040
|
|
7
|
भाकृअनुप-केंद्रीय सागरी मत्स्य संशोधन संस्था (CMFRI), कोची आणि तिची प्रादेशिक केंद्रे
|
23
|
622
|
|
8
|
भाकृअनुप-राष्ट्रीय मत्स्य अनुवांशिक संसाधन ब्युरो (NBFGR), लखनऊ आणि तिची प्रादेशिक केंद्रे
|
58
|
5592
|
|
9
|
भाकृअनुप-अटारी (ATARI)-कोलकाता (ओडिशा, पश्चिम बंगाल, अंदमान आणि निकोबार)
|
48
|
1660
|
|
10
|
भाकृअनुप-अटारी (ATARI)-जबलपूर (मध्य प्रदेश आणि छत्तीसगड)
|
3
|
75
|
|
11
|
भारतीय कृषी कौशल्य परिषद (ASCI)
|
26
|
796
|
|
12
|
आदिवासी उपयोजना (TSP)
|
51
|
3185
|
|
13
|
अनुसूचित जाती उपयोजना (SCSP)
|
19
|
950
|
|
14
|
केंद्रीय सागरी मत्स्यव्यवसाय आणि अभियांत्रिकी प्रशिक्षण संस्था (CIFNET)
|
11
|
450
|
| |
एकूण
|
499
|
22921
|
***
माधुरी पांगे/तुषार पवार/परशुराम कोर
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2213234)
आगंतुक पटल : 25