कृषी मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

केंद्रीय कृषी मंत्र्यांची फिजीच्या कृषी मंत्र्यांशी द्विपक्षीय बैठक,भारत–फिजी कृषी सहकार्य अधिक दृढ

प्रविष्टि तिथि: 09 JAN 2026 10:03PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 9 जानेवारी 2026

केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंह चौहान आणि फिजीचे कृषी व जलमार्ग मंत्री तोमासी तुनाबुना यांची आज नवी दिल्लीतील कृषी भवन येथे द्विपक्षीय बैठक झाली. या बैठकीत त्यांनी द्विपक्षीय सहकार्याबद्दल चर्चा केली आणि भविष्यातील सहकार्याचे क्षेत्र ठरवले.

परस्पर आदर, सहकार्य तसेच मजबूत सांस्कृतिक व जनसंपर्कामुळे भारत आणि फिजी यांच्यातील ऐतिहासिक संबंध अधिक दृढ होत आहेत, असे मंत्र्यांनी सांगितले. दोन्ही देशांमध्ये कृषी आणि अन्नसुरक्षा हे द्विपक्षीय सहकार्याचे महत्त्वाचे मुद्दे असल्याचे त्यांनी मान्य केले.

परस्पर हिताच्या अनेक मुद्द्यांवर दोघांची फलदायी चर्चा झाली. दोन देशांतील सामंजस्य कराराची मुदत  आणखी पाच वर्षांसाठी वाढवण्याचे आणि सहकार्य पुढे नेण्यासाठी संयुक्त कार्यगट स्थापन करण्याचे त्यांनी निश्चित केले. याशिवाय विद्यार्थी आदानप्रदान, प्रशिक्षण, लहान यंत्रसामग्री आणि डिजिटल कृषी साधनांचे तंत्रज्ञान यावर चर्चा झाली. संशोधन सुविधा मजबूत करणे, जनुकीय आदानप्रदान उपक्रम आणि अन्नाची नासाडी कमी करण्याबाबत ज्ञान सामायिकरण यावरही भर देण्यात आला.

फिजीच्या प्रतिनिधीमंडळात तुनाबुना यांच्यासह  साखर उद्योग मंत्री चरणजित सिंग, फिजीचे उच्चायुक्त जगन्नाथ सामी, साखर मंत्रालयाचे स्थायी सचिव डॉ. विनेश कुमार, फिजी शुगर कॉर्पोरेशनचे अध्यक्ष नित्य रेड्डी आणि उच्चायुक्तालयाचे सल्लागार पाओलो दाउरेवा यांचा समावेश होता.

भारताकडून कृषी व शेतकरी कल्याण विभागाचे सचिव देवेश चतुर्वेदी, कृषी संशोधन आणि शिक्षण विभागाचे सचिव एम. एल. जाट आणि इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.


निलीमा ‍चितळे/प्रज्ञा जांभेकर/प्रिती मालंडकर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 

 


(रिलीज़ आईडी: 2213114) आगंतुक पटल : 12
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Gujarati