रेल्वे मंत्रालय
रेल्वेने या वर्षाच्या वेळापत्रकात 549 गाड्या केल्या वेगवान, प्रवासाचा वेळ वाचणार
2025 मध्ये 122 नवीन गाड्या सुरू, प्रवाशांसाठी जलद आणि वेळेवर सेवा
प्रविष्टि तिथि:
09 JAN 2026 8:15PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 9 जानेवारी 2026
रेल्वेने गाड्यांचे वेळापत्रक (टॅग ) 2026 अंतर्गत मोठे बदल केले असून त्या अंतर्गत नव्या गाड्या सुरु करण्याबरोबरच सध्याच्या सेवांचा विस्तार, फेऱ्यांमध्ये वाढ, अतिजलद गाड्यांमध्ये रुपांतर आणि विविध विभागांमध्ये गाड्यांचा वेग वाढविला आहे.
या योजनेत 122 नवीन गाड्या सुरू करण्यात आल्या असून 86 गाड्यांच्या सेवेचा विस्तार केला आहे. याशिवाय 8 गाड्या जास्त फेऱ्या करू लागल्या, 10 गाड्या अति वेगवान श्रेणी मध्ये रूपांतरित केल्या आणि तब्बल 549 गाड्यांचा वेग वाढला आहे.
नवीन गाड्यांमध्ये विविध प्रकारांचा समावेश आहे. यात 26 अमृत भारत गाड्या, 60 मेल/ एक्स्प्रेस गाड्या, तसेच 2 हमसफर, 2 जनशताब्दी, 2 नमो भारत द्रुतगती रेल्वे सेवा आणि 2 राजधानी गाड्या सुरू करण्यात आल्या आहेत. याशिवाय 28 वंदे भारत गाड्या सुरू झाल्या, त्यामुळे अर्ध जलद वेग कनेक्टीव्हिटी अधिक चांगली झाली.
गाड्यांचा वेग वाढवणे
गाड्यांचा वेग वाढवण्यावरही विशेष भर देण्यात आला आहे. एकूण 549 गाड्यांपैकी 376 गाड्या 5 ते 15 मिनिटांनी, 105 गाड्या 16 ते 30 मिनिटांनी, 48 गाड्या 31 ते 59 मिनिटांनी आणि 20 गाड्या 60 मिनिटे किंवा त्याहून अधिक वेळाने वेगवान झाल्या आहेत.
या बदलांमुळे प्रवासाचा वेळ कमी होणार असून प्रवाशांना अधिक सोयीस्कर, वेळेवर आणि विश्वासार्ह सेवा पुरविण्यासाठीचा रेल्वेचा कटाक्ष यातून प्रतिबिंबित होत आहे. टॅग 2026 ही योजना भारतीय रेल्वेच्या कार्यक्षमतेत आणि कनेक्टीव्हिटीमध्ये सुधारणा करणारी ठरली आहे
निलीमा चितळे/प्रज्ञा जांभेकर/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2213049)
आगंतुक पटल : 20