वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
वाणिज्य व उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी लिक्टेनस्टाईनला दिली भेट, भारत–युरोपियन मुक्त व्यापार संघ (ईएफटीए) टीईपीए अंमलबजावणीचा घेतला आढावा, गुंतवणुकीसाठी केले आवाहन
प्रविष्टि तिथि:
07 JAN 2026 8:40PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 7 जानेवारी 2026
वाणिज्य व उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी 7 जानेवारी 2026 रोजी लिक्टेनस्टाईनचा अधिकृत दौरा केला. या दौऱ्यात त्यांनी वडूझ किल्ल्यात वारसदार राजपुत्र अलोइस व्हॉन उंड झू लिक्टेनस्टाईन यांना शिष्टाचार भेट दिली. पंतप्रधान ब्रिजिट हास, उपपंतप्रधान व परराष्ट्र, पर्यावरण आणि संस्कृती मंत्री साबिन मोनाउनी यांच्यासोबतही त्यांनी चर्चा केली. त्यांनी ऑस्ट्रियन प्रसारण संस्था ओआरएफला मुलाखत दिली. उपपंतप्रधानांनी दिलेल्या भोजनसमारंभात ते सहभागी झाले आणि हिल्ती एजीया कंपनीला भेट देऊन प्रमुखांशी संवाद साधला.
2026 मधील ही पहिली मंत्रीस्तरीय भेट होती. यातून भारताने भारत–युरोपियन मुक्त व्यापार संघटना व्यापार व आर्थिक भागीदारी करार (टीईपीए) जलद गतीने लागू करण्याची आणि त्याला दीर्घकालीन व्यापार, गुंतवणूक व उत्पादन भागीदारीत रूपांतरित करण्याची वचनबद्धता दाखवली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जागतिक अर्थव्यवस्थेत भारताच्या सकारात्मक भूमिकेवर व आशावादावर दिलेला भर याविषयी गोयल यांनी माहिती दिली.
टीईपीए हा भारताचा विकसित देशांच्या गटाशी झालेला पहिला मुक्त व्यापार करार आहे. यामुळे भारतीय उत्पादनांचा दर्जा सुधारत असल्याचे, निर्यातीत अधिक विविधता येत असल्याचे आणि भारताची उत्पादनक्षमता मेक इन इंडिया आणि मेक फॉर द वर्ल्ड या उपक्रमांना पाठबळ देत असल्याचे दिसते. टीईपीए मुळे भारत आणि युरोपियन मुक्त व्यापार संघ (ईएफटीए) यांच्यातील आर्थिक संबंध अधिक मजबूत आणि दर्जेदार होत आहेत. भारताचे उत्पादन क्षेत्र आता जगभर विक्रीसाठी सक्षम, स्पर्धात्मक आणि विश्वासार्ह झाले आहे.
लिक्टेनस्टाईनच्या नेतृत्व व व्यावसायिक समुदायाशी झालेल्या चर्चेत गोयल यांनी भारताची वाढती अर्थकथा मांडली. 2025मध्ये अंदाजे 4.13 ट्रिलियन अमेरिकी डॉलर राष्ट्रीय सकल उत्पादनासह जीडीपी सह भारत आज चौथ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था आहे.दोन्ही बाजूंनी जागतिक व्यावसायिक वातावरणावर विचारांची देवाणघेवाण केली. पुरवठा साखळ्यांमधील अडथळे, अनिश्चितता व अस्थिरतेला सामोरे जात असताना भारत व लिक्टेनस्टाईन मिळून गुंतवणूकदारांना स्थिरता व विश्वासार्हता देऊ शकतात. भारताचे प्रमाण, कौशल्य व उत्पादनक्षमता लिक्टेनस्टाईनच्या विशेष औद्योगिक क्षमता, उच्च मूल्य नवकल्पना व आर्थिक कौशल्याला पूरक ठरू शकतात.
हिल्ती एजी येथे मंत्र्यांनी उद्योग-उद्योग भागीदारी, अधिक मूल्यवर्धन, पुरवठा साखळीतील सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांचा सहभाग, आणि भारतातील उत्पादनाचा जागतिक कामकाजात विस्तार यावर भर दिला. त्यांनी लिक्टेनस्टाईन कंपन्यांना टीईपीएचा उपयोग करून भारतात उपस्थिती वाढवण्याचे, उत्पादन व नवकल्पना भागीदारी करण्याचे आणि भारतातील वाढत्या संधींमध्ये सहभागी होण्याचे आमंत्रण दिले.
उद्योगांनी एकमेकांशी भागीदारी करावी, उत्पादनात अधिक मूल्य वाढवावे, पुरवठा साखळीत सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग सहभागी व्हावेत आणि भारतातील उत्पादन जगभर वापरले जावे, असे हिल्ती एजी येथे त्यांनी सांगितले. टीईपीए कराराचा फायदा घेऊन भारतात आपली उपस्थिती वाढवावी, उत्पादन व नवकल्पनांमध्ये भाग घ्यावा आणि भारतातील वाढत्या संधींचा उपयोग करावा, असे आवाहन त्यांनी लिक्टेनस्टाईन कंपन्यांना केले.
भारत–लिक्टेनस्टाईन तसेच व्यापक भारत–ईएफटीए संबंध अधिक मजबूत करण्याच्या आवाहनाने बैठकीचा समारोप झाला. भारतातील महत्त्वाच्या व्यापार व गुंतवणूक उपक्रमांत सहभागी होण्याचे आणि व्यावसायिक संवाद व प्रतिनिधीमंडळांद्वारे अधिक सहकार्य करण्याचे आमंत्रण मंत्र्यांनी ईएफटीए कंपन्यांना दिले.
शैलेश पाटील/प्रज्ञा जांभेकर/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2212235)
आगंतुक पटल : 15