पोलाद मंत्रालय
सेल'ने डिसेंबरमधील आतापर्यंतची सर्वाधिक विक्री नोंदवली; एप्रिल - डिसेंबर 2025 मध्ये मजबूत वाढ राहिली कायम
प्रविष्टि तिथि:
05 JAN 2026 9:39PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 5 जानेवारी 2026
देशातील महारत्न सीपीएसई आणि आघाडीच्या स्टील उत्पादकांपैकी एक स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड (सेल)ने डिसेंबर 2025 मध्ये 2.1 दशलक्ष टन (तात्पुरती) विक्री नोंदवून आपल्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे. डिसेंबर 2024 मधील 1.5 दशलक्ष टन विक्रीच्या तुलनेत सुमारे 37% इतकी भरघोस वाढ झाली आहे.
डिसेंबर महिन्यातील कंपनीचे ही आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी आहे आणि कंपनीने उत्पादन श्रेणींमध्ये आणि विविध विक्री माध्यमांमध्ये नवीन शिखर गाठले असून इन्व्हेंटरी मध्येही लक्षणीय घट झाली आहे. ग्राहकांना वेळेत डिलिव्हरी देण्यावर लक्ष केंद्रित केल्यामुळे ही कामगिरी साध्य झाली आहे. सेल देखील अलीकडेच नव्या उत्साहाने ब्रँडिंग उपक्रम देखील हाती घेत आहे.
डिसेंबर महिन्यातील कामगिरीमुळे सेलला आर्थिक वर्ष 2025-26 मध्ये वाढीचा वेग कायम राखण्यास मदत झाली. एप्रिल-डिसेंबर 2025 पर्यंत विक्रीचे प्रमाण 14.7 दशलक्ष टन (तात्पुरते) पर्यंत पोहोचले, जे गेल्या वर्षातील याच अवधी दरम्यान 12.6 दशलक्ष टन होते, यात सुमारे 17% वाढ झाली आहे. देशांतर्गत बाजारपेठेत प्रस्थापित झालेल्या विक्रमांव्यतिरिक्त, निर्यातीचे प्रमाण देखील लक्षणीयरीत्या वाढले आहे, जे जागतिक स्तरावरील सेल चे वाढते अस्तित्व अधोरेखित करते.
या सातत्यपूर्ण सुधारणा सेलची बाजारपेठेतील मजबूत उपस्थिती, ग्राहक-केंद्रित उपक्रम आणि परिचालन उत्कृष्टता अधोरेखित करते. देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सेलने केलेल्या विक्रमी कामगिरीमुळे केवळ भारतातील आघाडीच्या कंपन्यांमध्येच त्याची स्थिती मजबूत झाली नाही तर जागतिक स्तरावरील अव्वल पोलाद कंपन्यांमध्येही आपले स्थान उंचावेल अशी अपेक्षा आहे.
* * *
निलिमा चितळे/सुषमा काणे/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2211637)
आगंतुक पटल : 18