कौशल्य विकास आणि उद्यमशीलता मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

कृत्रिम बुद्धिमत्तेबाबत जागरूकता वाढवणाऱ्या आणि भविष्यासाठी सज्ज शिक्षणाला चालना देणाऱ्या 'स्किल द नेशन चॅलेंज' स्पर्धेचा राष्ट्रपती मुर्मू यांनी केला शुभारंभ

एसओएआर एआय मॉड्युल पूर्ण करणाऱ्या जयंत चौधरी यांच्याकडून अन्य तीन जणांचे नामांकन

एसओएआर एआय अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या 15 खासदारांनी कृत्रिम बुद्धिमत्ता सज्जतेप्रति  असलेल्या मजबूत वचनबद्धतेचा दिला वस्तुपाठ

प्रविष्टि तिथि: 02 JAN 2026 4:45PM by PIB Mumbai

 

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी काल '#SkillTheNation चॅलेंज'ची घोषणा केली. देशाचे नागरिक, धोरणकर्ते, शिक्षक, व्यावसायिक आणि तरुणांनी स्किल इंडिया डिजिटल हब (एसआयडीएच) वरील एसओएआर (स्किलिंग फॉर एआय रेडीनेस) या अभ्यासक्रमात प्रवेश घेऊन भारताच्या एआय (कृत्रिम बुद्धिमत्ता) शिक्षण चळवळीत सक्रियपणे सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी केले. हा उपक्रम देशाला कृत्रिम बुद्धिमत्तेमध्ये भविष्यासाठी सज्ज क्षमतांनी सुसज्ज करण्याच्या आणि भारताच्या तांत्रिकदृष्ट्या सक्षम आणि समावेशक समाज घडवण्याचा प्रवास पुढे नेण्याच्या दिशेने एक महत्वाचे पाऊल असल्याचे त्यांनी सांगितले.

कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालयाचा एसओएआर- स्किलिंग फॉर एआय रेडीनेस  हा जुलै 2025 मध्ये सुरू करण्यात आलेला महत्वाकांक्षी कार्यक्रम, शालेय विद्यार्थी, शिक्षक, व्यावसायिक आणि आजीवन शिकणाऱ्यांसाठी रचलेल्या सूक्ष्म-क्रेडेन्शियल अभ्यासक्रमांद्वारे सर्वांसाठी एआय शिक्षण उपलब्ध करत आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता सोपी, नैतिक, जबाबदार आणि महत्वाकांक्षी बनवण्यासाठी डिझाइन केलेला एसओएआर कार्यक्रम, गेल्या सहा महिन्यांत एआय अभ्यासक्रमात प्रवेश घेतलेल्या 1.59 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचला असून, हजारो लोकांनी हा अभ्यासक्रम यशस्वीपणे पूर्ण केला आहे, आणि एआय जागरूकता, समज आणि वापर यामध्ये कौशल्य प्राप्त केले आहे.

जयंत चौधरी, कौशल्य विकास आणि उद्योजकता राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) आणि शिक्षण राज्यमंत्री, जयंत चौधरी यांनी एसओएआर 'एआय टू बी अवेअर' लर्निंग मॉड्यूल यशस्वीरित्या पूर्ण करून, आजीवन शिक्षण आणि एआय सज्जता यासाठी वचनबद्धतेचे उदाहरण ठेवले आहे आणि आपले नेतृत्व सिद्ध केले आहे. एआय जागरूकता आणि क्षमता वृद्धीसाठीची व्यापक राष्ट्रीय चळवळ पुढे नेण्यासाठी, त्यांनी आंध्र प्रदेश सरकारचे माहिती तंत्रज्ञान, इलेक्ट्रॉनिक्स आणि दळणवळण, थेट प्रशासन आणि मानव संसाधन विकास मंत्री नारा लोकेश राव, प्रसार भारतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) गौरव द्विवेदी, आयएएस, आणि अखिल भारतीय बुद्धिबळ महासंघाचे (एआयसीएफ) अध्यक्ष नितीन नारंग यांचे नामांकन केले आहे.

भारताचे भविष्यातील कार्यबळ केवळ डिजिटली जागृत असून चालणार नाही तर कृत्रिम बुद्धिमत्तेच्या ज्ञानाने संपन्न असणे आवश्यक आहे. मी स्वतः SOAR कृत्रिम बुद्धिमत्ता मॉड्युल यशस्वीरित्या पूर्ण केल्याबद्दल मला अतिशय आनंद वाटत आहे यामुळे ज्ञानार्जनाची सुरुवात नेतृत्वातून होणे आवश्यक आहे ही माझी विचारसरणी आता अधिक दृढ झाली आहे. या चळवळीत सहभागी होण्यासाठी माझ्या सहकाऱ्यांचे नाव निर्देशित करण्यात मला खूप समाधान वाटत आहे, यामुळे आपण एकत्रितपणे प्रत्येक नागरिकाला कृत्रिम बुद्धिमत्तेला कवेत घेण्यासाठी प्रेरणा देऊ शकतो आणि एका सक्षम आणि भविष्यासाठी सज्ज भारतासाठी त्यांना तयार करु शकतो." असे ते पुढे म्हणाले.

दिल्ली, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान, गुजरात, हरियाणा आणि हिमाचल प्रदेश येथील पीएम श्री शाळा, केंद्रीय विद्यालय आणि जवाहर नवोदय विद्यालयांमधील 17 निवडक विद्यार्थ्यांना या प्रसंगी भारताच्या राष्ट्रपतींच्या हस्ते एआय

अभ्यासक्रमाची प्रमाणपत्रे प्रदान करण्यात आली.

या उपक्रमाला संसदेचा देखील उत्तम प्रतिसाद लाभला.

एकूण 15 खासदारांनी SOAR AI अभ्यासक्रमाचे  मॉड्यूल यशस्वीरीत्या पूर्ण केले असून, यामुळे भारतीय लोकशाहीच्या सर्वोच्च संस्थेमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता विषयक तयारी मजबूत करण्याबाबत नेतृत्वाची ठाम बांधिलकी दिसून येते.

 

क्रमांक

खासदाराचे नाव

सभागृहाचे नाव (लोकसभा/राज्यसभा)

1

चंदनसिंह चौहान

लोकसभा

2

स्वाती मालीवाल राज्यसभ

राज्यसभा

3

उमेंदरराम बेनिवाल

लोकसभा

4

नारायण के भांडगे

राज्यसभा

5

कमलजीत सेहरावत

लोकसभा

6

मंजू शर्मा

लोकसभा

7

शोभनाबेन बरैया

लोकसभा

8

जी.एम. हरीश बालयोगी 

लोकसभा

9

संगीता यादव

राज्यसभा

10

फौजिया खान

राज्यसभा

11

पी. व्ही. अब्दुल वहाब

राज्यसभा

12

सुजीत कुमार

राज्यसभा

13

बिजुली कलिता मेधी

लोकसभा

14

हरिसबीरन

राज्यसभा

15

पी. पी. चौधरी

लोकसभा

***

शैलेश पाटील/राजश्री आगाशे/भक्ती सोनटक्के/परशुराम कोर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(रिलीज़ आईडी: 2210949) आगंतुक पटल : 15
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Gujarati , Malayalam