सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

सांख्यिकी आणि अंमलबजावणी उपक्रम मंत्रालयाने आपले (MoSPI) नवीन बोधचिन्ह आणि मॅस्कॉट यांचे केले अनावरण 

प्रविष्टि तिथि: 01 JAN 2026 9:09AM by PIB Mumbai

 

सांख्यिकी आणि अंमलबजावणी उपक्रम मंत्रालयाने आज दिनांक 1.1.2026  रोजी आपल्या मंत्रालयाचे  नवे बोधचिन्ह आणि नवे  मॅस्कॉट यांचे अनावरण केले.

हे अनावरण म्हणजे सांख्यिकी आणि अंमलबजावणी उपक्रम मंत्रालयाला संस्थात्मक ओळख देण्याचे आधुनिकीकरण करणे, सार्वजनिक स्तरावर प्रसार वाढवणे आणि राष्ट्र उभारणीत अधिकृत आकडेवारीची भूमिका बळकट करण्याच्या त्यांच्या प्रयत्नांमधील एक महत्त्वाचा टप्पा आहे.

सांख्यिकी आणि अंमलबजावणी उपक्रम मंत्रालयाचे हे नवे बोधचिन्ह  देशाच्या विकासात माहिती देण्याचे महत्त्व दर्शवितो आणि भारताचे डेटा-चालित प्रशासन, पारदर्शकता आणि प्रगतीला सुलभ करण्यासाठी मंत्रालयाच्या वचनबद्धतेचे प्रतिबिंब अधोरेखित करतो.भारताचा समृद्ध वारसा आणि आधुनिक सांख्यिकीय विज्ञानाने प्रेरित होऊन तयार केलेले हे बोधचिन्ह मंत्रालयाचा "डेटा फॉर डेव्हलपमेंट" (विकासाची माहिती) हा संदेश देतो.

बोधचिन्हामधील अशोक चक्र सत्य, पारदर्शकता आणि सुशासन दर्शवते.मध्यभागी असलेले रुपयाचे चिन्ह (₹) आर्थिक नियोजन, धोरणनिर्मिती आणि राष्ट्रीय विकासातील आकडेवारीची महत्त्वाची भूमिका अधोरेखित करते.विविध संख्या आणि चिन्हांचा वापर आधुनिक माहिती प्रणाली  आणि सांख्यिकी विज्ञान याचे प्रतिबिंब दर्शवतो.

मॅस्कॉट

सांख्यिकी आणि अंमलबजावणी उपक्रम मंत्रालयाने त्यांचे नवीन मॅस्कॉट, "सांख्यिकी" हे सुद्धा सादर केले आहे. हा मॅस्कॉट मैत्रीपूर्ण आणि नागरिक-केंद्री व्यक्तीचे चित्र दर्शवितो; जे देशभरातील लोकांसाठी आकडेवारी सुलभ, नाते सांगणारी आणि आकर्षक बनवणे हे मंत्रालयाचे कार्य सूचित करत आहे. हा मॅस्कॉट अचूकता, पारदर्शकता आणि डेटा-चालित प्रशासन या सांख्यिकी आणि अंमलबजावणी उपक्रम मंत्रालयाच्या प्रमुख मूल्यांचे प्रतिबिंब दर्शवितो  आणि सामान्य लोकांना समजण्यास सोप्या पद्धतीने डेटा सादर करतो.

एक विश्वासार्ह आणि बुद्धिनिष्ठ मंत्रालय असे स्वरूप दर्शवित डिझाइन केलेले, "सांख्यिकी" हा मॅस्कॉट जटिल सांख्यिकीय संकल्पना सुलभ आणि दृश्य पद्धतीने स्पष्ट करण्यास मदत करते. मंत्रालयाची सार्वजनिक ओळख म्हणून काम करणारे हे बोधचित्र राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण, जागरूकता मोहिमा, शैक्षणिक सामग्री, डिजिटल प्लॅटफॉर्म आणि सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये वापरले जाईल. त्याची ओळख राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयीन (NSO) सर्वेक्षणांमध्ये अधिकाधिक लोकसहभागाला प्रोत्साहन देण्यासाठी आणि सातत्यपूर्ण आणि  दृश्यमान उपस्थितीद्वारे अधिकृत आकडेवारीवरील विश्वास मजबूत करण्यासाठी उचललेले एक महत्त्वाचे पाऊल आहे.

***

नेहा कुलकर्णी / संपदा पाटगावकर / परशुराम कोर

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 2210808) आगंतुक पटल : 16
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Gujarati , Tamil