रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय
ओडिशातील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक -326 वरील 68.600 किमी ते 311.700 किमी दरम्यानच्या सध्याच्या दोन पदरी रस्त्याचे पेव्हड शोल्डरसह दोन पदरी रुंदीकरण आणि मजबुतीकरणासाठी 1526.21 कोटी रुपयांच्या प्रकल्पाला ईपीसी पद्धतीवर मंत्रिमंडळाची मंजुरी
प्रविष्टि तिथि:
31 DEC 2025 5:40PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 31 डिसेंबर 2025
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाने आज ओडिशा राज्यातील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक-326 च्या किमी 68.600 ते किमी 311.700 दरम्यानच्या सध्याच्या दोन पदरी रस्त्याचे पेव्हड शोल्डरसह दोन पदरी रुंदीकरण आणि मजबुतीकरण प्रकल्पाला ईपीसी (अभियांत्रिकी, खरेदी आणि बांधकाम) पद्धतीने राष्ट्रीय महामार्ग (O) अंतर्गत मंजुरी दिली.
आर्थिक परिणाम:
या प्रकल्पाचा एकूण भांडवली खर्च 1,526.21 कोटी रुपये आहे, ज्यामध्ये 966.79 कोटी रुपये नागरी बांधकाम खर्चाचा समावेश आहे.
फायदे:
एनएच -326 च्या श्रेणीसुधारणामुळे प्रवास वेगवान, सुरक्षित आणि अधिक विश्वासार्ह होईल, परिणामी दक्षिण ओडिशाचा सर्वांगीण विकास होईल आणि विशेषत्वाने गजपती, रायगडा आणि कोरापुट जिल्ह्यांना याचा फायदा होईल. सुधारलेल्या रस्ते जोडणीमुळे स्थानिक समुदाय, उद्योग, शैक्षणिक संस्था आणि पर्यटन केंद्रांना बाजारपेठा, आरोग्यसेवा आणि रोजगाराच्या संधींपर्यंत पोहोचणे सुलभ होईल, ज्यामुळे प्रदेशाच्या सर्वसमावेशक वाढीस हातभार लागेल.
ज्यात रोजगार निर्मितीच्या क्षमतेसह प्रमुख परिणाम:
- या प्रकल्पाचा उद्देश प्रवास अधिक जलद आणि सुरक्षित करणे तसेच दक्षिण आणि पूर्व ओदिशा दरम्यानची संपर्क व्यवस्था सुधारणे, विशेषतः गजपती, रायगडा आणि कोरापुट जिल्ह्यांना राज्याच्या उर्वरित भागाशी आणि शेजारील आंध्र प्रदेशशी जोडणे हा आहे. सुधारलेले रस्ते जाळे औद्योगिक वाढीस चालना देईल, पर्यटनाला प्रोत्साहन देईल, शिक्षण आणि आरोग्य सुविधांपर्यंत पोहोच सुलभ करेल तसेच दक्षिण ओडिशाच्या आदिवासी आणि मागास भागांच्या सर्वांगीण सामाजिक-आर्थिक विकासात योगदान देईल.
- बांधकाम आणि देखभालीच्या काळात हाती घेतलेल्या विविध कामांमुळे कुशल, अर्ध-कुशल आणि अकुशल कामगारांसाठी मोठ्या प्रमाणात प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगाराच्या संधी निर्माण होतील अशी अपेक्षा आहे. हा प्रकल्प बांधकाम साहित्य पुरवठा, वाहतूक, उपकरणांची देखभाल आणि संबंधित सेवांमध्ये गुंतलेल्या स्थानिक उद्योगांनाही चालना देईल, ज्यामुळे प्रादेशिक अर्थव्यवस्थेला हातभार लागेल.
पार्श्वभूमी:
शासनाने 14 ऑगस्ट 2012 रोजीच्या राजपत्रातील अधिसूचनेद्वारे, "ओदिशा राज्यात आस्काजवळील एनएच -59 सोबतच्या जंक्शनपासून सुरू होणारा, मोहना, रायपंका, अमलभाटा, रायगडा, लक्ष्मीपूर मार्गे जाणारा आणि चिंतूरजवळील एनएच -30 सोबतच्या जंक्शनवर समाप्त होणारा महामार्गाचा पट्टा" हा एनएच -326 म्हणून घोषित केला आहे.
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा
* * *
निलिमा चितळे/श्रद्धा मुखेडकर/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2210243)
आगंतुक पटल : 6