रेल्वे मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

सण-उत्सव आणि गर्दीच्या हंगामात सुलभ प्रवासाची सुनिश्चिती करण्यासाठी भारतीय रेल्वेने 2025 मध्ये चालवल्या 43,000 हून अधिक विशेष रेल्वे फेऱ्या

प्रविष्टि तिथि: 26 DEC 2025 8:53PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 26 डिसेंबर 2025

 

प्रमुख धार्मिक कार्यक्रम आणि प्रवासाच्या गर्दीच्या हंगामात सुरळीत, सुरक्षित आणि सोयीस्कर प्रवासाची खात्री करण्यासाठी भारतीय रेल्वेने मोठ्या संख्येने विशेष रेल्वे फेऱ्या चालवून प्रवाशांसाठी व्यापक उपाययोजना केल्या आहेत. हे उपक्रम वाढत्या प्रवाशांची मागणी पूर्ण करण्यासाठी आणि देशभरात अखंड संपर्क सुविधा प्रदान करण्याच्या रेल्वेच्या निरंतर वचनबद्धतेचे प्रतिबिंब आहेत. 2025 मध्ये, विशेष रेल्वे सेवांमध्ये लक्षणीय वाढ करण्यात आली, यामुळे अधिक नियोजनबद्धता आणि प्रवाशांच्या सोयीवर दिलेला भर अधोरेखित होतो.

2025 मध्ये, भारतीय रेल्वेने महाकुंभासाठी सर्वात मोठ्या विशेष रेल्वे सेवांपैकी एक मोहीम हाती घेतली, ज्यात मोठ्या संख्येने येणाऱ्या भाविकांच्या सोयीसाठी 13 जानेवारी ते 28 फेब्रुवारी 2025 दरम्यान 17,340 विशेष रेल्वे फेऱ्या चालवण्यात आल्या. होळी 2025 साठी 1 मार्च ते 22 मार्च 2025 दरम्यान 1,144 विशेष रेल्वे फेऱ्या चालवण्यात आल्या. ही संख्या होळी 2024 मध्ये चालवलेल्या फेऱ्यांच्या जवळपास दुप्पट होती. वाढीव रेल्वे फेऱ्यांमुळे अधिक उपलब्धता आणि सणासुदीच्या काळात सुरळीत प्रवास सुनिश्चित झाला.

2025 च्या उन्हाळी हंगामात 1 एप्रिल ते 30 जून या कालावधीतील, 12,417 उन्हाळी विशेष रेल्वे फेऱ्या चालवण्यात आल्या. यामुळे सुट्ट्यांच्या गर्दीच्या महिन्यांत उच्च दर्जाची रेल्वे सेवा राखली गेली. छठ पूजा 2025 साठी विशेष व्यवस्था आणखी मजबूत करण्यात आली, ज्यात 1 ऑक्टोबर ते 30 नोव्हेंबर 2025 दरम्यान 12,383 विशेष रेल्वे फेऱ्या चालवण्यात आल्या. ही संख्या मागील वर्षाच्या तुलनेत लक्षणीय वाढ दर्शवते.

तुलनेने, 2024 च्या उन्हाळी हंगामात 12,919 उन्हाळी विशेष रेल्वे फेऱ्या चालवण्यात आल्या होत्या, तर छठ पूजा 2024 च्या काळात 1 ऑक्टोबर ते 31 डिसेंबर 2024 दरम्यान 7,990 विशेष रेल्वे फेऱ्या चालवण्यात आल्या. 

2025 मध्ये विशेष रेल्वे सेवांच्या या लक्षणीय विस्तारातून भारतीय रेल्वेची प्रवाशांच्या सोयीसाठी, गर्दीच्या कार्यक्षम व्यवस्थापनासाठी आणि जास्त मागणीच्या काळात विश्वसनीय प्रवासासाठी असलेली निरंतर वचनबद्धता अधोरेखित होते.

 

* * *

निलिमा चितळे/श्रद्धा मुखेडकर/दर्शना राणे

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 2208993) आगंतुक पटल : 30
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: Tamil , English , Urdu , हिन्दी , Gujarati