रेल्वे मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

सागरी क्षेत्र, पूल आणि बोगदा अभियांत्रिकी, संरक्षण लॉजिस्टिक्स आणि बहुविध वाहतूक नियोजनासाठी गती शक्ती विद्यापीठ महत्वाची भूमिका बजावेल - अश्विनी वैष्णव

प्रविष्टि तिथि: 19 DEC 2025 5:02PM by PIB Mumbai

 

गती शक्ती विद्यापीठाची (जीएसव्ही) दुसरी कोर्ट बैठक नवी दिल्लीतील रेल भवन येथे पार पडली. विद्यापीठाचे कुलपती म्हणून या बैठकीचे अध्यक्षस्थान भूषवताना केंद्रीय रेल्वे, माहिती आणि प्रसारण तसेच इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले की, “कार्यान्वित झाल्यापासून गती शक्ती विद्यापीठाने अवघ्या 3 वर्षांत आपल्या उद्योग-केंद्रित दृष्टिकोनामुळे उल्लेखनीय प्रगती साधली असून ते देशासाठी एक आदर्श बनले आहे. रेल्वे आणि हवाई  वाहतूक क्षेत्रांवर आपले लक्ष केंद्रित ठेवत, जीएसव्ही पूल आणि बोगदा अभियांत्रिकी, जहाज बांधणीवर भर देऊन सागरी क्षेत्रातील अभ्यासक्रम अधिक सखोल करेल. यासोबतच संरक्षण दल आणि रेल्वे कर्मचाऱ्यांचे कौशल्य वाढवण्यासाठी अधिक योगदान देईल; आणि एकात्मिक वाहतूक नियोजनासाठी उपयोजित संशोधन करेल.

गती शक्ती विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. मनोज चौधरी यांनी विद्यापीठाच्या प्रगती आणि स्थितीचा सविस्तर अहवाल सादर केला. सर्व सदस्यांनी इतक्या कमी वेळात विद्यापीठाच्या उत्कृष्ट प्रगतीची, विशेषतः उद्योगांसोबतचे सहकार्य, रेल्वे, संरक्षण दल आणि नागरी सेवांसाठी पीएम गती शक्ती अंतर्गत दिल्या जाणाऱ्या कार्यकारी प्रशिक्षणाची त्यांनी प्रशंसा केली. कोर्टच्या सदस्यांनी पूल आणि बोगदा अभियांत्रिकी, जहाज बांधणी, रेल्वे, संरक्षण क्षेत्रातील लॉजिस्टिक्स आणि पुरवठा साखळीच्या भविष्यातील प्रगतीसाठी अनेक सूचना आणि सहयोगात्मक सूचना दिल्या.

गती शक्ती विद्यापीठ (जीएसव्ही),हे वाहतूक आणि लॉजिस्टिक्स क्षेत्रातील भारतातील अग्रगण्य विद्यापीठ आहे. या विद्यापीठाची स्थापना 2022 मध्ये संसदेच्या कायद्याद्वारे केंद्रीय विद्यापीठ म्हणून करण्यात आली. रेल्वे मंत्रालयाच्या (भारत सरकार) अंतर्गत कार्यरत असलेल्या या विद्यापीठात रेल्वे, महामार्ग, बंदरे, विमान वाहतूक, सागरी, जहाजबांधणी, देशांतर्गत जलमार्ग, शहरी वाहतूक तसेच संपूर्ण लॉजिस्टिक्स आणि पुरवठा साखळी नेटवर्क अशा संपूर्ण वाहतूक क्षेत्राचा समावेश आहे.

***

निलिमा चितळे/श्रद्धा मुखेडकर/परशुराम कोर

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 2206711) आगंतुक पटल : 21
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Gujarati , हिन्दी , Odia , Kannada