संरक्षण मंत्रालय
संरक्षण मंत्र्यांनी नवी दिल्लीत नेदरलँड्सच्या परराष्ट्र मंत्र्यांची भेट घेतली
प्रविष्टि तिथि:
18 DEC 2025 6:00PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 18 डिसेंबर 2025
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी 18 डिसेंबर 2025 रोजी नवी दिल्ली येथे नेदरलँड्सचे परराष्ट्र मंत्री डेव्हिड वॅन वील यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान दोन्ही देशांमधील भक्कम आणि वाढत्या संरक्षण भागीदारीचा पुनरुच्चार करण्यात आला. दोन्ही मंत्र्यांनी द्विपक्षीय सुरक्षा आणि संरक्षण मुद्द्यांवर चर्चा केली, ज्यामध्ये संरक्षण उपकरणांचा सह-विकास आणि सह-उत्पादन यांसारख्या प्राधान्य क्षेत्रांचा समावेश होता. धोरणात्मक भागीदारीचा एक मुख्य स्तंभ म्हणून संरक्षण सहकार्य विकसित करण्यावर आणि लष्करी सहकार्य वाढवण्याच्या वचनबद्धतेवर त्यांनी भर दिला.


या चर्चेत भारत आणि नेदरलँड्सचा मुक्त, खुल्या, सर्वसमावेशक आणि नियमांवर आधारित 'इंडो-पॅसिफिक' क्षेत्रासाठीचा सामायिक दृष्टिकोन ठळकपणे मांडण्यात आला. दोन्ही मंत्र्यांनी दोन्ही देशांमधील संरक्षण उद्योगांना जोडण्याची आणि विशेषतः अतिशय विशिष्ट प्रकारच्या तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात अधिक जवळून काम करण्याची गरज व्यक्त केली. दोन्ही मंत्र्यांच्या उपस्थितीत संरक्षण सचिव राजेश कुमार सिंह आणि भारतातील नेदरलँड्सच्या राजदूत मारिसा जेरार्ड्स यांच्यात संरक्षण सहकार्याबाबतच्या इरादापत्रा ची देवाणघेवाण झाली.

तंत्रज्ञान सहकार्य, प्लॅटफॉर्म आणि उपकरणांचे सह-उत्पादन आणि सह-विकास यासाठी 'संरक्षण औद्योगिक आराखडा' तयार करून, उभय देशांना फायदेशीर ठरेल अशा विशिष्ट निवडक क्षेत्रांमध्ये संरक्षण सहकार्याच्या शक्यता पडताळून पाहण्याचा दोन्ही देशांचा मानस आहे. राजनाथ सिंह यांनी नमूद केले की, दोन्ही देशांमधील परस्पर संबंध अतिशय दृढ आहेत आणि नेदरलँड्समधील मोठा भारतीय समुदाय हा मैत्रीचे बंध अधिक दृढ करणारा एक जिवंत दुवा म्हणून काम करत आहे.

निलीमा चितळे/शैलेश पाटील/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2206116)
आगंतुक पटल : 16