युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

प्रजासत्ताक दिन सोहळा–2026 च्या स्पर्धांसाठी माय भारत अंतर्गत समर्पित पोर्टलचा प्रारंभ

प्रविष्टि तिथि: 17 DEC 2025 7:00PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 17 डिसेंबर 2025

प्रजासत्ताक दिन सोहळा–2026 चा भाग म्हणून, युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाने माय भारत पोर्टलच्या माध्यमातून निबंध लेखन, चित्रकला आणि घोषवाक्य/स्वाक्षरी स्पर्धांसह राष्ट्रीय स्तरावरील युवा स्पर्धा आयोजित करण्यासाठी एक समर्पित वेबपेज सुरू केले आहे.

देशभरातील युवा वर्गात देशभक्ती, सर्जनशीलता आणि नागरी सहभागाला प्रोत्साहन देणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे. इच्छुक स्पर्धक माय भारत पोर्टलवरील https://mybharat.gov.in/pages/republic_day_2026 या समर्पित पानावर नोंदणी करून सहभागी होऊ शकतात.
 
उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या स्पर्धकांसाठी बक्षीसाच्या रकमेची तरतूदही केली गेली असून, निवडक युवा स्पर्धकांना प्रजासत्ताक दिन सोहळा–2026 च्या संचलन सोहळ्यात सहभागी होण्यासाठी निमंत्रित केले जाणार आहे.

सुषमा काणे/तुषार पवार/प्रिती मालंडकर 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(रिलीज़ आईडी: 2205485) आगंतुक पटल : 26
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी