रेल्वे मंत्रालय
बीएलडब्ल्यूने स्वदेशी बनावटीचे सहावे 3300 एचपी रेल्वे इंजिन मोझांबिकला पाठवले
Posted On:
16 DEC 2025 8:00PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 16 डिसेंबर 2025
बनारस रेल्वे इंजिन कारखान्याने (बीएलडब्ल्यू ) 15 डिसेंबर 2025 रोजी मोझांबिकला सहावे स्वदेशी बनावटीचे 3300 अश्वशक्तीचे एसी-एसी डिझेल-इलेक्ट्रिक रेल्वे इंजिन यशस्वीरित्या पाठवून लोकोमोटिव्ह निर्मितीच्या क्षेत्रात आंतरराष्ट्रीय स्तरावर पुन्हा एकदा भारताचा झेंडा फडकवला आहे.

एक महत्त्वाचा टप्पा गाठत बीएलडब्ल्यूने मोझांबिकसाठी दहा 3300 अश्वशक्तीच्या एसी-एसी डिझेल-इलेक्ट्रिक रेल्वे इंजिनची निर्यात ऑर्डर मिळवली. त्यांचा पुरवठा मे. राइटसद्वारे 10 रेल्वे इंजिनांच्या निर्मिती आणि निर्यातीच्या कराराअंतर्गत केला जात आहे. पहिली दोन रेल्वे इंजिन जून 2025 मध्ये पाठवण्यात आली, त्यानंतर सप्टेंबरमध्ये तिसरे आणि ऑक्टोबरमध्ये चौथे इंजिन पाठवण्यात आले. पाचवे रेल्वे इंजिन 12 डिसेंबर रोजी आणि त्यानंतर सहावे 15 डिसेंबर रोजी पाठवण्यात आले. ही निर्यात जागतिक स्तरावर लोकोमोटिव्ह निर्मितीमध्ये भारताच्या वाढत्या क्षमता अधोरेखित करते.

बीएलडब्ल्यूद्वारे निर्मित ही अत्याधुनिक 3300 एचपी केप गेज (1067 मिमी) रेल्वे इंजिने 100 किमी प्रतितास वेगापर्यंत धावण्यास सक्षम आहेत. यामध्ये रेफ्रिजरेटर, हॉट प्लेट, मोबाईल होल्डर आणि आधुनिक कॅब डिझाइन यांसारख्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या, चालकांसाठी सोयीस्कर वैशिष्ट्यांचा समावेश आहे, ज्यामुळे आरामदायकता आणि कार्यक्षमतेत वाढ होते.
आतापर्यंत, भारताने युनायटेड किंगडम, फ्रान्स, स्पेन, जर्मनी, इटली इत्यादी युरोपीय देशांना मेट्रो कोच, बोगी, पॅसेंजर कोच, लोकोमोटिव्ह आणि इतर महत्त्वपूर्ण रेल्वे सामग्री निर्यात केली आहे. आफ्रिकेत, मोझांबिक, गिनी प्रजासत्ताक, दक्षिण आफ्रिका इत्यादी देशांचा समावेश आहे. ज्या इतर प्रमुख देशांमध्ये ही सामग्री निर्यात करण्यात आली आहे, त्यामध्ये म्यानमार, बांगलादेश, श्रीलंका, ऑस्ट्रेलिया, कॅनडा आणि मेक्सिको यांचा समावेश आहे.

लोकोमोटिव्ह निर्यातीमधील बीएलडब्ल्यूची कामगिरी भारताची तंत्रज्ञान विषयक वाढती आत्मनिर्भरता आणि जागतिक रेल्वे सामग्री बाजारपेठेत त्याचा विस्तारत असलेला प्रभाव दर्शवते.
सुषमा काणे/सोनाली काकडे/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2204851)
अभ्यागत कक्ष : 39