आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
आयुष्यमान वय वंदना योजनेविषयी अद्ययावत माहिती
प्रविष्टि तिथि:
12 DEC 2025 4:28PM by PIB Mumbai
आयुष्मान भारत - प्रधानमंत्री जन आरोग्य योजना ही सरकारची एक प्रमुख योजना आहे. या योजनेअंतर्गत भारताच्या लोकसंख्येतील आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या तळाच्या 40% लोकसंख्येतील 12 कोटी कुटुंबांना द्वितीय आणि तृतीय स्तरावरील रुग्णालयीन उपचारांसाठी, दरवर्षी प्रति कुटुंब 5 लाख रुपयांचे आरोग्य कवच दिले जाते. या योजनेत कुटुंबाच्या आकाराच्या बाबतीत कोणतीही मर्यादा आखून दिलेली नाही; आणि पात्र कुटुंबातील सर्व सदस्यांचा वय आणि लिंग निरपेक्ष समावेश केला जातो. केंद्र सरकारने 70 वर्षे आणि त्यापेक्षा जास्त वयाच्या सर्व ज्येष्ठ नागरिकांना, त्यांच्या सामाजिक-आर्थिक स्थितीचा विचार न करता, दर वर्षी 5 लाख रुपयांचे मोफत आरोग्य कवच पुरवण्याच्या उद्देशाने, ऑक्टोबर 2024 मध्ये, आयुष्मान भारत - प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा विस्तार केला.
सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये मिळून 05.12.2025 पर्यंतच्या आकडेवारीनुसार 93 लाखांपेक्षा जास्त आयुष्यमान वय वंदना कार्ड तयार करण्यात आली आहेत.
ही योजना राबवत असलेल्या राज्ये/ केंद्रशासित प्रदेशांमध्ये-31.10.2025 पर्यंत, आयुष्यमान वय वंदना श्रेणीअंतर्गत 1,741 कोटी रुपये खर्च मूल्याच्या एकूण 7.89 लाख रुग्णालयीन प्रवेशांना मंजुरी दिली गेली. याव्यतिरिक्त, वेळोवेळी गरजेनुसार नवीन प्रक्रियांचा समावेश, नवीन रुग्णालयांचा पॅनेलवर समावेश करणे, नवीन लाभार्थ्यांचा समावेश करणे आणि इतर सुधारणांच्या माध्यमातून उपचारांचा विस्तारही केला जात आहे. ही योजनेअंतर्गत 4.5 कोटी कुटुंबांतील 70 वर्षे आणि त्यापेक्षा जास्त वयाच्या 6 कोटी ज्येष्ठ नागरिकांना, त्यांच्या सामाजिक-आर्थिक स्थितीचा विचार न करता सहभागी करून घेतले गेले आहे.
यासंबंधीची माहिती केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी आज राज्यसभेत एका लेखी उत्तरात दिली.
***
सुवर्णा बेडेकर / तुषार पवार / परशुराम कोर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 2203375)
आगंतुक पटल : 5