पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

हवामान वित्त परिवर्तनावर आयोजित काॅप-28 अध्यक्षीय सत्रात पंतप्रधान झाले सहभागी

प्रविष्टि तिथि: 01 DEC 2023 8:39PM by PIB Mumbai

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 01 डिसेंबर 2023 रोजी, संयुक्त अरब अमिरात-यूएईत दुबई येथे हवामान वित्त  परिवर्तनावर आयोजित काॅप-28 अध्यक्षीय सत्रात सहभाग घेतला. या कार्यक्रमाचा भर, विकसनशील देशांसाठी हवामान वित्तपुरवठा अधिक उपलब्ध, सुलभ आणि परवडणारा बनवण्यावर होता.

सत्रादरम्यान, नेत्यांनी "नवीन जागतिक हवामान वित्त आराखड्यावरील यूएई घोषणापत्र" स्वीकारले. या घोषणापत्रात, इतर बाबींसोबतच, हवामान विषयक कृतींसाठी केलेल्या प्रतिबद्धता पूर्ण करणे, महत्त्वाकांक्षी उद्दिष्ट्ये साध्य करणे आणि सवलतीच्या वित्तपुरवठ्याचे  स्रोत वाढवणे या घटकांचा समावेश आहे.

आपल्या भाषणादरम्यान, पंतप्रधानांनी ग्लोबल साउथ या विकसनशील देशांच्या समुहाला भेडसावणाऱ्या  चिंता मांडल्या आणि विकसनशील देशांना त्यांच्या हवामानविषयक महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी आणि त्यांच्या राष्ट्रीय निर्धारित योगदानाची अंमलबजावणी करण्यासाठी अंमलबजावणीची साधने , विशेषत: हवामान वित्तपुरवठा, तातडीने उपलब्ध करून देण्याच्या गरजेचा पुनरुच्चार केला.

पंतप्रधानांनी, काॅप-28 मध्ये नुकसान आणि हानी निधी (Loss and Damage Fund) कार्यान्वित झाल्याचे आणि यूएई हवामान गुंतवणूक निधीची (UAE climate Investment Fund) स्थापना झाल्याचे स्वागत केले.

काॅप-28 ने हवामान वित्तपुरवठ्याशी संबंधित खालील मुद्द्यांवर कार्यवाही करावी असे आवाहन, पंतप्रधानांनी यावेळी केले:

  • हवामान वित्तासाठी ठरवण्यात येणाऱ्या नवीन सामूहिक आणि परिमाणित ( प्रमाण मोजता येणारी) उद्दिष्टांवर (New Collective Quantified Goal) सातत्याने होत असलेली प्रगती
  • ग्रीन क्लायमेट फंड (हवामान बदलाचा सामना करण्यासाठी  विकसनशील देशांना पुरवला जाणारा निधी) आणि ॲडॉप्टेशन फंड (हवामान बदलाच्या परिणामांशी जुळवून घेण्यासाठी  विकसनशील देशांना मदत करणारा निधी) यांना पुन्हा आवश्यक तेवढा निधी उपलब्ध करून देणे.
  • बहुपक्षीय विकास बँकांनी (MDBs) हवामान कृतीसाठी परवडणारा वित्तपुरवठा (Affordable Finance) उपलब्ध करून देणे.
  • विकसित देशांनी 2050 पूर्वी त्यांचे कार्बन उत्सर्जन (Carbon Footprint) संपुष्टात आणावे.

***

आशिष सांगळे / आशुतोष सावे / परशुराम कोर

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 2202890) आगंतुक पटल : 10
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: Kannada , English , Urdu , हिन्दी , Bengali , Manipuri , Assamese , Punjabi , Gujarati , Odia , Tamil , Telugu , Malayalam