संरक्षण मंत्रालय
भारतीय नौदलाच्या सेवेत दाखल होणार पहिले स्वदेशी डायव्हिंग सपोर्ट क्राफ्ट ‘डीएससी ए20’
प्रविष्टि तिथि:
11 DEC 2025 9:19PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 11 डिसेंबर 2025
भारतीय नौदल 16 डिसेंबर 2025 रोजी कोची येथे दक्षिण नौदल कमांडच्या अंतर्गत स्वदेशी बनावटीच्या आणि निर्मितीच्या 'डायव्हिंग सपोर्ट क्राफ्ट' (डीएससी) मालिकेतील पहिले जहाज, 'डीएससी ए20' कार्यान्वित करणार आहे. दक्षिण नौदल कमांडचे फ्लॅग ऑफिसर कमांडिंग-इन-चीफ, व्हाइस ॲडमिरल समीर सक्सेना यांच्या उपस्थितीत हे जहाज औपचारिकपणे सेवेत दाखल केले जाईल. या सोहळ्यामुळे नौदलाच्या ताफ्यात एक महत्त्वपूर्ण परिचालन साधन सामील होईल, ज्यामुळे त्याची पाणबुडी आणि पाण्याखालील सहाय्य क्षमता वाढेल.
डीएससी ए20 ही कोलकाता येथील मेसर्स टिटागड रेल सिस्टीम्स लिमिटेड (टीआरएसएल) द्वारे बांधल्या जात असलेल्या पाच डायव्हिंग सपोर्ट जहाजांच्या मालिकेतील प्रमुख जहाज आहे. किनारी पाण्यातील विविध प्रकारच्या डायव्हिंग आणि पाण्याखालील मोहिमांसाठी विशेषत्वाने बांधलेले हे जहाज
सुरक्षा आणि परिचालन कार्यक्षमतेच्या सर्वोच्च मानकांची पूर्तता करणाऱ्या प्रगत, अत्याधुनिक डायव्हिंग प्रणालींनी सुसज्ज आहे,
कॅटामरान हल रचनेमुळे, हे जहाज उत्कृष्ट स्थिरता, वाढीव डेक क्षेत्र आणि सुधारित सागरी कार्यक्षमता प्रदान करते आणि त्याचे विस्थापन अंदाजे 390 टन आहे. इंडियन रजिस्टर ऑफ शिपिंगचे (आय आर एस) नौदल नियम आणि विनिमय यानुसार आरेखन केलेल्या आणि बांधलेल्या डीएससी ए20 या जहाजाची विशाखापट्टणम येथील नेव्हल सायन्स अँड टेक्नोलॉजिकल लॅबोरेटरी (एन एस टी एल) मध्ये विस्तृत हायड्रोडायनामिक विश्लेषण आणि प्रारूप चाचणी करण्यात आली, ज्यामुळे त्याची सर्वोत्तम कार्यक्षमता आणि विश्वसनीयता सुनिश्चित झाली आहे.
डीएससी ए20 नौदलात सामील होण्याने भारताच्या आत्मनिर्भरतेच्या दिशेने वाटचालीतील एक महत्त्वाचा टप्पा गाठला गेला असून हे सागरी क्षेत्रातील 'मेक इन इंडिया' उपक्रमाच्या यशाचे एक उत्तम उदाहरण आहे. हा मंच म्हणजे भारतीय नौदल, स्वदेशी जहाजबांधणी उद्योग आणि राष्ट्रीय संशोधन संस्था यांच्यातील विशेष, तांत्रिकदृष्ट्या प्रगत जहाजे तयार करण्याच्या क्षेत्रातील अखंड सहकार्याचे प्रतीक आहे.
याच्या समावेशामुळे भारतीय नौदलाची डायव्हिंग सपोर्ट, पाण्याखालील तपासणी, बचावकार्य सहाय्य आणि किनारी परिचालन तैनाती या क्षेत्रांतील क्षमता लक्षणीयरीत्या मजबूत होतील. डीएससी ए20 कोची येथे तैनात असेल आणि ते दक्षिण नौदल कमांडच्या अंतर्गत कार्यरत राहील.
(1)E2U3.jpg)
(1)CLF6.jpg)
(1)JNH7.jpg)
शैलेश पाटील/नंदिनी मथुरे/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2202643)
आगंतुक पटल : 10