नौवहन मंत्रालय
कोकण किनारपट्टीवर क्रूझ पर्यटनाचा विकास
प्रविष्टि तिथि:
09 DEC 2025 5:59PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 9 डिसेंबर 2025
पर्यटन मंत्रालयाने क्रूझ पर्यटनाच्या विकासासाठी पर्यटन सचिवांच्या अध्यक्षतेखाली आणि जहाजबांधणी सचिवांच्या सह-अध्यक्षतेखाली एक कृती दल स्थापन केले आहे, ज्यामध्ये महाराष्ट्राचे पर्यटन सचिव देखील सदस्य आहेत.
पर्यटन मंत्रालय केंद्रीय एजन्सी योजना आणि स्वदेश दर्शन योजनेअंतर्गत राज्य सरकारे/केंद्रशासित प्रदेश प्रशासने/केंद्र सरकारी एजन्सींना क्रूझ पर्यटनासह पर्यटन विकासासाठी केंद्रीय आर्थिक सहाय्य प्रदान करते आणि महाराष्ट्रातील 4 प्रकल्पांसाठी निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे.पर्यावरण आणि सीआरझेड मंजुरीसाठीच्या सर्व प्रस्तावांची लागू कायद्यानुसार केंद्र सरकारद्वारे तपासणी केली जाते. केंद्रीय बंदर जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्र्यांनी राज्यसभेत लेखी उत्तरात ही माहिती दिली.
निलीमा चितळे/सुषमा काणे/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2201019)
आगंतुक पटल : 27