ऊर्जा मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

कोळसा-आधारित औष्णिक ऊर्जा निर्मितीतील कार्बन उत्सर्जन आणि पर्यावरणीय परिणामांवर उपाययोजना

प्रविष्टि तिथि: 08 DEC 2025 9:29PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 8 डिसेंबर 2025

कोळसा-आधारित औष्णिक ऊर्जा निर्मितीमुळे होणारे कार्बन उत्सर्जन आणि पर्यावरणीय परिणाम कमी करण्यासाठी, केंद्र सरकार पुढील पावले उचलत आहे:

(i) कार्यक्षम सुपरक्रिटिकल/ अल्ट्रा सुपरक्रिटिकल युनिट्स

ऊर्जा मंत्रालय कार्यक्षम सुपरक्रिटिकल/ अल्ट्रा सुपरक्रिटिकल युनिट्सच्या स्थापनेला प्रोत्साहन देत आहे, ही युनिटस् अधिक कार्यक्षम आहेत आणि प्रति युनिट वीज निर्मितीसाठी कार्बन डायऑक्साईडचे उत्सर्जन कमी करतात. 31.10.2025 पर्यंत अनुक्रमे 70,190 मेगावॅटस् (101 युनिटस्) आणि 7,680 मेगावॅटस् (11 युनिटस्) क्षमतेची सुपरक्रिटिकल/ अल्ट्रा-सुपरक्रिटिकल युनिट्स कार्यान्वित करण्यात आली आहेत.

(ii) 'परफॉर्म अचिव्ह अँड ट्रेड' योजना

ऊर्जा कार्यक्षमता सुधारण्यासाठी विविध औष्णिक ऊर्जा प्रकल्पांमध्ये परफॉर्म अचिव्ह अँड ट्रेड योजना लागू करण्यात आली आहे. ऊर्जा कार्यक्षमतेतील सुधारणा औष्णिक ऊर्जा निर्मितीतील कार्बन डायऑक्साइड उत्सर्जन कमी करते.

(iii) बायोमास गोळ्यांचे सह-ज्वलन

तांत्रिक व्यवहार्यता तपासल्यानंतर, कोळसा-आधारित ऊर्जा प्रकल्पांमध्ये बायोमास गोळ्या [नगरपालिका घनकचऱ्यापासून बनवलेल्या टॉरेफाईड चारकोलसह] कोळशासह 5-7% प्रमाणात मिसळून वापरण्यासाठी ऊर्जा मंत्रालयाने 07.11.2025 रोजी एक सर्वसमावेशक धोरण जारी केले आहे.

(iv.) चिमणी उत्सर्जनातील कपात

पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाने 07.12.2015 रोजीच्या अधिसूचनेद्वारे आणि त्यानंतरच्या सुधारणांद्वारे कोळसा-आधारित औष्णिक ऊर्जा प्रकल्पांमधून उत्सर्जित कण पदार्थ, Sox आणि NOx सारखे चिमणी उत्सर्जन कमी करण्यासंबंधीचे नियम अधिसूचित केले आहेत. ही मानके पूर्ण करण्यासाठी, औष्णिक ऊर्जा प्रकल्प इलेक्ट्रोस्टॅटिक प्रीसिपिटेटर, फ्लू गॅस डीसल्फरायझेशन, NOx ज्वलन सुधारणा इत्यादी तंत्रांचा वापर करत आहेत.

(v) प्रायोगिक कार्बन कॅप्चर प्रकल्प

NTPC Ltd. ने त्यांच्या विंध्याचल औष्णिक ऊर्जा केंद्रात दर दिवशी 20 टन क्षमतेचा एक प्रायोगिक कार्बन कॅप्चर प्रकल्प कार्यान्वित केला आहे.

ऊर्जा राज्यमंत्री श्रीपाद येसो नाईक यांनी आज राज्यसभेत एका लेखी उत्तरात ही माहिती दिली.

नेहा कुलकर्णी/निखिलेश चित्रे/प्रिती मालंडकर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com

 

 

 

 


(रिलीज़ आईडी: 2200647) आगंतुक पटल : 5
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी