रेल्वे मंत्रालय
महापरिनिर्वाण दिनानिमित्त केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अर्पण केली पुष्पांजली
प्रविष्टि तिथि:
06 DEC 2025 4:16PM by PIB Mumbai
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 70 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त केंद्रीय रेल्वे, माहिती-प्रसारण आणि इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी नवी दिल्लीत रेल भवन येथे डॉ. आंबेडकरांना पुष्पांजली अर्पण केली.

केंद्रीय मंत्री वैष्णव यांनी समाज माध्यमावरील संदेशाद्वारे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करताना, डॉ. आंबेडकर समानता व न्यायाचे दीपस्तंभ आहेत अशा शब्दांत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
या कार्यक्रमाला रेल्वे मंडळाचे अध्यक्ष व सीईओ सतीश कुमार, वरीष्ठ अधिकारी, रेल्वे मंडळाचे सदस्य आणि अखिल भारतीय एससी/एसटी रेल्वे कर्मचारी संघटनेचे प्रतिनिधी उपस्थित होते. या कार्यक्रमात राज्यघटनेच्या निर्मितीमधील बाबासाहेबांचे योगदान, त्यांची निर्णायक भूमिका आणि समानता, न्याय व निष्पक्ष वृत्ती याबाबतचे विचार यांना उजाळा देण्यात आला.
दरवर्षी 6 डिसेंबर रोजी भारतरत्न डॉ. भीमराव रामजी आंबेडकर अर्थात बाबासाहेब आंबेडकर यांचा स्मृतीदिन महापरिनिर्वाण दिन म्हणून साजरा केला जातो. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बी. आर. आंबेडकर यांचा जन्म 14 एप्रिल 1891 या दिवशी मध्य प्रदेशमध्ये महू येथे झाला. समाजाकडून होणारा भेदभाव व अन्याय सहन कराव्या लागणाऱ्या दलित, महिला आणि कामगारांच्या उध्दारासाठी त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य व्यतीत केले. त्यांच्या स्मृतीदिनी त्यांना भारतभरातील लाखो लोक आदरांजली अर्पण करतात. त्यांची शिकवण आणि न्याय्य व सर्वसमावेशक समाजनिर्मितीसाठी त्यांनी दिलेले योगदान याचे या दिवशी स्मरण केले जाते.
***
माधुरी पांगे/सुरेखा जोशी/परशुराम कोर
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2199829)
आगंतुक पटल : 16