संरक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि रशियाचे संरक्षण मंत्री आंद्रेई बेलौसोव्ह नवी दिल्ली येथे लष्करी आणि लष्करी तांत्रिक सहकार्यावरील भारत-रशिया आंतर-सरकारी आयोगाच्या 22 व्या बैठकीचे सहअध्यक्षपद भूषवणार

Posted On: 03 DEC 2025 9:29PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 3 डिसेंबर 2025

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि रशियाचे संरक्षण मंत्री आंद्रेई बेलौसोव्ह, 04 डिसेंबर 2025 रोजी नवी दिल्ली येथे लष्करी आणि लष्करी तांत्रिक सहकार्यावरील 22 व्या भारत-रशिया आंतर-सरकारी आयोगाच्या मंत्रिस्तरीय बैठकीचे सह-अध्यक्षपद भूषवतील. 

दोन्ही नेते संरक्षण क्षेत्रातील दोन्ही देशांमधील बहुआयामी संबंधांचा आढावा घेतील,यामध्‍ये  लष्करी आणि लष्करी तांत्रिक सहकार्याचा समावेश आहे. परस्पर हिताच्या समकालीन प्रादेशिक आणि जागतिक मुद्द्यांवरही ते विचारांची देवाणघेवाण करतील. या भेटीदरम्यान, रशियाचे संरक्षण मंत्री नवी दिल्लीतील राष्ट्रीय युद्ध स्मारकाला भेट देतील, आणि कर्तव्य बजावताना देशासाठी सर्वोच्च बलिदान देणाऱ्या भारतीय सैनिकांना आदरांजली वाहतील.

सुवर्णा बेडेकर/राजश्री आगाशे/प्रिती मालंडकर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com

 

 


(Release ID: 2198509) अभ्यागत कक्ष : 34