इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय
स्टार्ट अप्स आणि काही डेटा विश्वस्तांसाठी डीपीडीपी कायद्याअंतर्गत सुलभीकृत अनुपालन व्यवस्था
डीपीडीपी कायद्याच्या सर्वदूर प्रसार आणि स्वीकारासाठी सरकार प्रयत्नशील
प्रविष्टि तिथि:
03 DEC 2025 9:00PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 3 डिसेंबर 2025
डिजिटल खाजगी डेटा सुरक्षा कायदा , 2023 आणि डिजिटल खाजगी डेटा सुरक्षा नियम,2025 यांची सूचना 13 नोव्हेंबर 2025 रोजी दिली गेली आहे. संबंधित तरतुदी लागू होण्याची मुदत त्यामध्ये दिली गेली आहे. डिजिटल डेटा सुरक्षा मंडळाला नियमांच्या तरतुदीबद्दल सूचित केले गेले आहे.
हा कायदा आणि नियम स्टार्ट अप्स तसेच काही डेटा विश्वस्तांसाठी एक सुलभीकृत अनुपालन व्यवस्था तयार करत आहे.
खाजगी डेटा चे हस्तांतरण करण्यावर कोणकोणत्या अधिकारक्षेत्रात बंधने लागू आहेत याबद्दल सरकारने सूचित करावे असा या कायद्यात आणि नियमात उल्लेख आहे.
डीपीडीपी कायद्याच्या सर्वदूर प्रसार आणि स्वीकारासाठी सरकारने नागरिकांना त्यांचे हक्क व कर्तव्ये याबद्दल माहिती करून देण्यास सुरुवात केली आहे. क्षमता बांधणीसाठी कार्यशाळा , परिषदा, तज्ज्ञांची सत्रे, आणि डिजिटल प्रसार मोहिमा आयोजित केल्या जात आहेत.
ही माहिती केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान राज्य मंत्री जितीन प्रसाद यांनी लोकसभेत 3 डिसेंबर 2025 रोजी सादर केली.
सुवर्णा बेडेकर/उमा रायकर/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 2198488)
आगंतुक पटल : 6