पर्यावरण, वन एवं जलवायु परिवर्तन मंत्रालय
राष्ट्रीय जैवविविधता प्राधिकरणाकडून उपलब्धतेचा लाभ आणि लाभ वितरण आराखड्याअंतर्गत महाराष्ट्रासाठी 5.34 कोटी रुपये जारी
Posted On:
27 NOV 2025 10:04PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 27 नोव्हेंबर 2025
राष्ट्रीय जैवविविधता प्राधिकरणाने (एनबीए) महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यातील वाडा तालुका तसेच बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अखत्यारीतील विविध नागरी परिसर आणि ग्रामपंचायतींअंतर्गत असलेल्या सुमारे 85 जैवविविधता व्यवस्थापन समित्यांसाठी 5.34 कोटी रुपये जारी केले आहेत. स्थानिक समुदायांचे सक्षमीकरण तसेच लाभांच्या निष्पक्ष आण समन्यायी वाटपला चालना देण्यासाठी महत्त्वाच्या राबवल्या जात असलेल्या उपाययोजनांअंतर्गत प्राधिकरणाने हा निधी वितरीत केला. आता हा निधी प्रत्यक्षात महाराष्ट्र राज्य जैवविविधता मंडळाद्वारे हस्तांतरीत केला जाईल.
एका कंपनीने बॅसिलस (Bacillus) या वंशाचे मातीतील सूक्ष्मजीव मिळवले आणि त्यांचा प्रोबायोटिक उत्पादने विकसित करण्यासाठी वापर केला होता. या प्रकरणानंतर हा निधी वितरीत केला गेला आहे. विशेष म्हणजे उपलब्धतेचा लाभ आणि लाभ वाटपासाठी आलेल्या अर्जांपैकी सुमारे 15% अर्ज हे, संबंधित सूक्ष्मजीव मिळवण्यासाठीचेच आहेत. यातून हे सूक्ष्मजीव शेतकरी, स्थानिक समुदाय, जैवविविधता व्यवस्थापन समित्या आणि इतर भागधारकांसाठी मोठ्या व्याप्तीचे लाभ मिळवून देण्यासाठी उपयुक्त ठरू शकतात ही बाब अधोरेखित झाली आहे.
राष्ट्रीय जैवविविधता प्राधिकरण हे जैवविविधतेचे खरे पालक असलेल्या स्थानिक समुदायांची दखल घेऊन, त्यांना लाभांचा निष्पक्ष आण समन्यायी वाटा मिळेल, याची सुनिश्चिती करण्यासाठी वचनबद्धता आहे. आणि या उपक्रमातून प्राधिकरणाची ही वचनबद्धता अधिक दृढ झाली आहे. संवर्धनाचे प्रयत्न थेट समुदायांच्या समृद्धी आणि कल्याणासाठी कामी येथील हाच देशाचा शाश्वत आणि समावेशक जैवविविधता व्यवस्थापनाच्या दृष्टिकोन आहे. आणि प्राधिकरणाने आपल्या या उपक्रमाच्या माध्यमातून राष्ट्रीय जैवविविधता प्राधिकरणाने पाठबळही पुरवले आहे.
यापूर्वी राष्ट्रीय जैवविविधता प्राधिकरणाने महाराष्ट्रातील 108 जैवविविधता व्यवस्थापन समित्या आणि 7 संस्थांना 2.56 कोटी रुपयांहून अधिक निधी जारी केला होता. 5.34 कोटी रुपयांचे हे विद्यमान वितरणाने त्यांच्या या प्रयत्नांमध्ये मोठी भर घातली आहे. या निधी वितरणासह, उपलब्धतेचा लाभ आणि लाभ वाटपाअंतर्गतचे देशाच्या एकूण वितरणाने 116 कोटी रुपयांचा टप्पा पार केला आहे. उपलब्धतेचा लाभ आणि लाभ वाटप यंत्रणेच्या प्रभावी अंमलबजावणीच्या बाबतीत भारत जगासाठी पथदर्शी देश ठरला आहे.
सुवर्णा बेडेकर/तुषार पवार/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2195664)
Visitor Counter : 6