संरक्षण मंत्रालय
भारत आणि इंडोनेशियाचे संरक्षण मंत्री नवी दिल्ली इथे होणाऱ्या तिसऱ्या भारत-इंडोनेशिया संरक्षण मंत्र्यांच्या संवादाचे सह-अध्यक्षस्थान भूषवणार
प्रविष्टि तिथि:
26 NOV 2025 10:38PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 26 नोव्हेंबर 2025
केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह हे दि. 27 नोव्हेंबर 2025 रोजी नवी दिल्ली येथे इंडोनेशियाचे संरक्षण मंत्री सजाफ्री स्यामसुद्दीन यांच्यासमवेत तिसऱ्या भारत-इंडोनेशिया संरक्षण मंत्र्यांच्या संवादाचे सह-अध्यक्षस्थान भूषवणार आहेत. या बैठकीदरम्यान, दोन्ही मंत्री प्रादेशिक सुरक्षा आणि बहुपक्षीय मुद्द्यांवर विचारांचे आदानप्रदान करतील, तसेच द्विपक्षीय संरक्षण सहकार्य आणखी वृद्धींगत करण्याच्या पर्यायांची चाचपणी करतील.
इंडोनेशियाच्या संरक्षण मंत्री दोन दिवसांच्या (दि. 26 आणि 27 नोव्हेंबर 2025) भारत दौऱ्यावर आले आहेत. त्यांच्या या भेटीतून भारत आणि इंडोनेशियामधील संरक्षण विषयक सहकार्यपूर्ण भागिदारीची वाढती गती अधोरेखित होते. तसेच दोन्ही देशांमधील भागीदारी अधिक वृद्धींगत करण्यासह, तिचा विस्तार करण्याबद्दल दोन्ही देशांची वचनबद्धताही यातून अधोरेखित झाली आहे. या वर्षी जानेवारी महिन्यातच इंडोनेशियाच्या राष्ट्रपतींनी भारताचा दौरा केला होता. त्यानंतर लगेचच या दौराही आखला गेला.
भारत आणि इंडोनेशियात हजारो वर्षांपासून नागरी संबंध आहेत. दोन्ही देश परस्परांचे सागरी शेजारी असून, दोन्ही देशांमध्ये अनेक शतकांपासून परस्पर सामायिक सांस्कृतिक, नागरी आणि ऐतिहासिक संबंध अस्तित्वात आहेत.
अलिकडच्या काळातील घडामोडींमधून उभय देशांमधील व्यापक धोरणात्मक भागीदारीत द्विपक्षीय आणि बहुपक्षीय स्तरावरील वाढती सहकार्यपूर्ण भागिदारीही दिसून आली आहे. यात सातत्यपूर्ण उच्च स्तरीय संवादांचाही अंतर्भाव असून, यामुळे भारताच्या ‘Act East policy’ अर्थात पूर्वेकडील देशांबाबतच्या धोरणात्मक कृतीलाही बळ मिळाले आहे.
सुवर्णा बेडेकर/तुषार पवार/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2195428)
आगंतुक पटल : 16