56 व्या इफ्फीतील 7 व्या दिवसाची महत्वाची क्षणचित्रे : समीक्षा, वेशभूषा आणि व्हीएफएक्समधील नवोन्मेषाचे पैलू उपलगणारे मास्टरक्लास
#IFFIWood, 26 नोव्हेंबर 2025
56 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या (इफ्फी) आजच्या सातव्या दिवशी, चित्रपट निर्मितीच्या सर्जनशील, समीक्षात्मक आणि तंत्रज्ञानविषयक आयामांचा समांतरपणे शोध घेणाऱ्या तीन महत्त्वपूर्ण मास्टरक्लासेसचे आयोजन करण्यात आले.
'थंब'च्या पलीकडे – चित्रपट समीक्षकाची भूमिका




या बहुआयामी गोलमेज सत्रात प्रसिद्ध आंतरराष्ट्रीय समीक्षक एकाच मंचावर आले होते. त्यांनी डिजिटल युगातील चित्रपट समीक्षेच्या विकसित होत असलेल्या भूमिकेवर चर्चा केली. समाज माध्यमांनी निर्माण केलेला व्यत्यय आणि कृत्रिम बुद्धिमत्तेच्या आधारे तयार होणारी आशय सामग्रीच्या पार्श्वभूमीवर आज समीक्षक एखादे द्वारपाल, प्रभाव पाडणारी व्यक्तीमत्वे आणि सांस्कृतिक मध्यस्थ म्हणून कशी भूमिका बजावत आहेत, याचे समीक्षण या सत्रात करण्यात आले. स्वतंत्र आणि पहिला चित्रपट बनवणाऱ्या चित्रपट दिग्दर्शक - निर्मात्यांना पाठबळ देण्यासाठी विचारी आणि विश्वसार्ह समीक्षांचे महत्त्व आजही कायम असल्याची बाब या वक्त्यांनी अधोरेखित केली.
वेशभूषा आणि व्यक्तिरेखेचा आलेख : चित्रपट जगतातील कल ठरवणारे घटक







या ज्ञानवर्धक चर्चेत वेशभूषेचे स्वरुप, एखाद्या व्यक्तिरेखेची ओळख, भावनिक चढउतार आणि कथानकावर होणारे परिणामांना कशा रितीने आयाम देतात ही बाब उलगडली गेली. वेशभूषाकार रंग, पोत आणि शैलीचा वापर करून व्यक्तिरेखेच्या दृश्यात्मक आलेखाचा पट कसा निश्चित करतात, कथानकाचा कसा विस्तार करतात, आणि सिनेमा जगतातील कलांवर कशा रितीने प्रभाव टाकतात यावर तज्ञांनी चर्चा केली.
पूर्णतः व्हीएफएक्स आधारित निर्मितीची भव्यता – पीट ड्रेप यांचा मास्टरक्लास




व्हीएफएक्सचे प्रणेते पीट ड्रेप यांनी पूर्णतः व्हिज्युअल-इफेक्ट्स कार्यपद्धती उलगडून दाखवणारा एक रंजक मास्टरक्लास घेतला. यात त्यांनी निर्मितीपूर्व नियोजन ते प्रत्यक्ष सेटवरील अंमलबजावणी आणि निर्मिती पश्चात प्रक्रियांचा अंतर्भाव होता. बाहुबली, आरआरआर (RRR) आणि ईगा (Eega) यांसारख्या चित्रपटांमधील आपल्या अनुभवाच्या आधारे, ड्रेप यांनी सहभागींना, मोठ्या प्रमाणात सिनेमॅटिक व्हिज्युअल्स तयार करण्याबद्दल अनमोल ज्ञान दिले, तसेच व्यावहारिक मार्गदर्शन केले.
* * *
PIB IFFI CAST AND CREW | सुवर्णा बेडेकर/तुषार पवार/दर्शना राणे| IFFI 56
Release ID:
2195325
| Visitor Counter:
9