युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय
सरदार @150 एकात्मता पदयात्रेसाठी आयोजित ऐतिहासिक उद्घाटन समारंभाने राष्ट्रीय पदयात्रेला झाला प्रारंभ
पंतप्रधानांचे आशीर्वाद सरदार @150 एकात्मता पदयात्रेला मार्गदर्शन करतील; युवा शक्तीला राष्ट्रीय सामर्थ्य आणि एकात्मतेचे आधारस्तंभ : पंतप्रधान
राष्ट्रीय पदयात्रेत जिल्हा-स्तरीय पदयात्रा आणि दिल्ली, जयपूर, नागपूर आणि मुंबईहून निघालेले चार प्रवाह मार्ग - यात्रा होणार एकत्र
प्रविष्टि तिथि:
26 NOV 2025 7:51PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 26 नोव्हेंबर 2025
सरदार वल्लभभाई पटेल यांच्या दीडशेव्या जयंतीनिमित्त केल्या जाणाऱ्या राष्ट्रव्यापी स्मरण सोहळ्याची ऐतिहासिक सुरुवात करत, केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाच्या मेरा युवा (एमवाय)भारत उपक्रमातर्फे आज आणंद येथून सरदार@150 राष्ट्रीय एकात्मता पदयात्रेची सुरुवात करण्यात आली.केवडिया येथील स्टॅच्यू ऑफ युनिटी पर्यंत पोहोचण्यासाठी 11 दिवसांत ही पदयात्रा 180 किमीचे अंतर पार करणार असून, देशभरात ऐक्याचा संदेश पोहोचवण्यासाठी आणि एक भारत, आत्मनिर्भर भारत या संकल्पना आणखी मजबूत करण्याच्या दिशेने एक महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे.


आज सकाळी, मान्यवरांनी सरदार पटेल यांच्या करमसाद येथील वडिलोपार्जित घराला भेट दिली आणि तेथे पुष्पांजली अर्पण करून भारताच्या लोहपुरुषाला श्रद्धांजली वाहिली. गुजरात राज्याचे मुख्यमंत्री भूपेंद्रभाई पटेल, त्रिपुराचे मुख्यमंत्री डॉ.माणिक साहा आणि केंद्रीय महिला आणि बालविकास राज्यमंत्री अनुप्रिया पटेल या सर्वांनी सरदार पटेल यांचे जीवन, तत्वे आणि एकत्रित आणणारे नेतृत्व यांच्याविषयी देशाची सामुहिक कृतज्ञता व्यक्त केली. राष्ट्रीय एकात्मतेसाठी सरदार पटेल यांनी दिलेल्या योगदानाचा सन्मान करत, या पदयात्रेच्या मार्गावर महत्त्वाच्या ठिकाणी प्रतिमा सन्मान कार्यक्रमाचेही आयोजित करण्यात आले होते.

गुजरात मधील वल्लभ विद्या नगरच्या शास्त्री मैदानावर झालेल्या उद्घाटन समारंभाला गुजरातचे मुख्यमंत्री, त्रिपुराचे मुख्यमंत्री, केंद्रीय महिला आणि बालविकास राज्यमंत्री निमुबेन बांभनिया; ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण राज्यमंत्री; वरिष्ठ अधिकारी, युवा प्रतिनिधी आणि हजारो माय भारत स्वयंसेवक यांच्या उपस्थितीने कार्यक्रमाची शोभा वाढली. भारतभरातून आलेल्या तरुणांच्या जोशपूर्ण सहभागाने राष्ट्रीय पदयात्रेला प्रचंड उत्साहाने सुरुवात झाली. सरदार पटेल यांच्या एकता, राष्ट्रनिर्माण आणि दृढनिश्चयाच्या अतुलनीय वारशाचा सन्मान करण्यासाठी सहभागी तरुणांनी एकत्र पाऊल टाकले.

या समारंभाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विशेष आशीर्वाद लाभले. एका हृदयस्पर्शी लिखित संदेशांद्वारे त्यांनी तरुणांना एकता मार्चमध्ये सक्रियपणे सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित केले. सरदार पटेल यांची प्रेरणादायी भावना आजही राष्ट्राला मार्गदर्शन करते, पंतप्रधानांनी पुनरुच्चार केला. एक सक्षम गतिशील आत्मनिर्भर भारत घडवण्यात तरुण नागरिकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे, हे त्यांनी अधोरेखित केले. या कार्यक्रमात सरदार गीत प्रथमच सादर करण्यात आले. मागील काही आठवड्यांपासून देशभरातील जिल्हास्तरीय पदयात्रा आणि रस्ते यात्रांचे संकलित व्हिडिओ यावेळी दाखवण्यात आले. मान्यवरांच्या उपस्थितीत आत्मनिर्भर भारत प्रतिज्ञा देण्यात आली. दुपारी 12:00 वाजता मान्यवरांनी संयुक्तपणे राष्ट्रीय पदयात्रेला हिरवा झेंडा दाखवला.

राष्ट्रीय पदयात्रेच्या सोबतच चार राष्ट्रीय प्रवाह रस्ते यात्रा - गंगा, यमुना, नर्मदा आणि गोदावरी, आपापल्या नियुक्त मार्गांवरून पुढे जात आहेत. हे चार प्रवाह देशातील विविध राज्यांचे प्रतिनिधित्व सुनिश्चित करतात. गंगा प्रवाह दिल्ली येथून, यमुना प्रवाह जयपूर येथून, नर्मदा प्रवाह नागपूर येथून आणि गोदावरी प्रवाह मुंबई येथून 28 नोव्हेंबर रोजी सुरू होणार आहे. चारही प्रवाहातील पदयात्री गुजरातमधील आणंद येथे एकत्र येऊन राष्ट्रीय पदयात्रेत सामील होतील. या प्रवाहांमध्ये युवा शक्तीचा व्यापक सहभाग, सामुदायिक संपर्क आणि सांस्कृतिक संवाद यांचा समावेश आहे, जो भारताच्या विविध प्रदेशांच्या एकतेच्या सामायिक संदेशासाठी एकत्रित येण्याचे प्रतीक आहे.

पहिल्या दिवशी मिळालेला प्रचंड प्रतिसाद भारताच्या एकता आणि राष्ट्र उभारणीसाठी सरदार पटेल यांच्या योगदानाबद्दलचा गहिरा भावनिक आदर दर्शवितो. पुढील काही दिवसांत, राष्ट्रीय पदयात्रा अनेक जिल्ह्यांमध्ये पुढे जात राहील, ज्यामध्ये प्रदर्शने, सरदार गाथा, ग्रामसभा, सांस्कृतिक कार्यक्रम आणि सामुदायिक संवाद उपक्रमांचे आयोजन केले जाईल. यातून राष्ट्रीय एकात्मता, सामाजिक जबाबदारी आणि सामूहिक उद्दिष्टांचा संदेश अधिक दृढ केला जाईल.

सुवर्णा बेडेकर/गोपाळ चिपलकट्टी/संजना चिटणीस/श्रद्धा मुखेडकर/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2194952)
आगंतुक पटल : 13