ग्रामीण विकास मंत्रालय
केंद्रीय ग्रामविकास आणि कृषी तसेच शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या हस्ते नई चेतना 4.0 – लिंगभाव समानता आणि महिला सक्षमीकरण यावर आधारित राष्ट्रीय अभियानाची सुरुवात
हे स्वप्न साकार करण्यासाठी, महिला सक्षमीकरणाला मजबुती देत आणि देशभरातील ग्रामीण महिलांसाठी संधींचा विस्तार करत सरकार निरंतर काम करत आहे: केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान
प्रविष्टि तिथि:
25 NOV 2025 7:24PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 25 नोव्हेंबर 2025
केंद्रीय ग्रामविकास आणि कृषी तसेच शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी आज नवी दिल्ली येथील सुषमा स्वराज भवनात आयोजित कार्यक्रमामध्ये, नई चेतना 4.0 या लिंगभाव समानता आणि महिला सक्षमीकरण यावर आधारित राष्ट्रीय अभियानाची सुरुवात केली. यावेळी केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्री अन्नपूर्णा देवी, केंद्रीय ग्रामविकास आणि दळणवळण राज्यमंत्री डॉ. चंद्रशेखर पेम्मसानी यांच्यासह केंद्रीय ग्रामविकास राज्यमंत्री कमलेश पासवान उपस्थित होते.

यावेळी बीजभाषण करताना, केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी कोणतीही भगिनी गरिबीत पिचणार नाही, कोणतीही महिला तिच्या डोळ्यात अश्रू घेऊन जगणार नाही आणि प्रत्येक भगिनीला लखपती दीदी म्हणून सन्मान, आत्मविश्वास आणि समृद्धता लाभावी याची सुनिश्चिती करून घेण्याच्या पंतप्रधानांच्या निर्धाराला दुजोरा दिला. देशातील स्वयंसहाय्यता बचत गटांतील दोन कोटींहून अधिक महिला यापूर्वीच लखपती दीदी झाल्या आहेत हे अधोरेखित करून ते म्हणाले की हे स्वप्न साकार करण्यासाठी, महिला सक्षमीकरणाला मजबुती देत आणि देशभरातील ग्रामीण महिलांसाठी संधींचा विस्तार करत सरकार निरंतर काम करत आहे
सरकारमधील 11 सहयोगी मंत्रालये/विभाग यांनी स्वाक्षऱ्या केलेली एक आंतर-मंत्रालयीन संयुक्त सूचना “संपूर्णतः सरकारी” दृष्टीकोनाच्या प्रेरणेचे मूर्त रूप धारण करत, लिंगभावाधारित भेदभाव आणि हिंसाचार यांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी प्रत्येक सहयोगी मंत्रालय/विभागाच्या ताकदीचा वापर करून घेण्यात येत आहे.
केंद्रीय मंत्री अन्नपूर्णा देवी यांनी या कार्यक्रमात बोलताना हे अधोरेखित केले की केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्रालय, केंद्रीय कायदा आणि न्याय मंत्रालय आणि केंद्रीय ग्रामविकास मंत्रालय यांच्यात झालेल्या आंतर-मंत्रालयीन त्रिपक्षीय सामंजस्य करार-हेतू पत्र ग्रामीण भागातील मुली आणि महिलांसाठी सुरक्षितता, अधिकार सक्षमीकरणाच्या संधींची सुनिश्चिती करत, हिंसाचार-मुक्त गाव उपक्रमांतर्गत आदर्श गावांच्या विकासात पुढाकार घेईल.

केंद्रीय ग्रामविकास मंत्रालयाच्या अखत्यारीतील दीनदयाळ अंत्योदय योजना- राष्ट्रीय ग्रामीण उपजीविका अभियानाद्वारे (डीएवाय-एनआरएलएम) आयोजित करण्यात आलेले हे एक महिना चालणारे अभियान भारतातील सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये येत्या 23 डिसेंबर 2025 पर्यंत राबवले जाईल. डीएवाय-एनआरएलएममधील बचत गटांच्या विस्तृत जाळ्याच्या माध्यमातून राबवण्यात येत असलेला हा उपक्रम लोक चळवळीच्या भावनेला मूर्त रूप देतो.
केंद्रीय राज्यमंत्री डॉ. चंद्रशेखर पेम्मसानी यांनी त्यांच्या भाषणातून स्वयंसहाय्यता बचत गटाच्या माध्यमातून जागृत झालेल्या 10 कोटी ग्रामीण महिलांनी नई चेतना या उपक्रमाला एका सशक्त मुलभूत चळवळीत रुपांतरीत केले आहे हे अधोरेखित केले.

नई चेतना 4.0 हे अभियान लिंगभावाधारित हिंसाचाराविरुद्ध सामुदायिक कृतीला बळ देते आणि ग्रामीण भागातील महिलांची सुरक्षितता, सन्मान तसेच आर्थिक सक्षमीकरण यांना चालना देते. हे अभियान सुरक्षित गतिमानता सुनिश्चित करून महिलांना महत्त्वाच्या आर्थिक योगदानकर्त्या म्हणून मान्यता देते आणि सामायिक सामुदायिक जबाबदारीच्या माध्यमातून विना-मोबदला सेवाभावी कार्याची दखल घेते. लिंगभाव-प्रतिसादात्मक धोरणे आणि आर्थिक तरतुदींचे समर्थन करून हे अभियान समानता आणि समावेशक ग्रामीण विकासाप्रती डीएवाय-एनआरएलएमच्या कटिबद्धतेला मजबूत करत सर्व पातळ्यांवर महिलांची मते निर्णय प्रक्रियेला आकार देतील हे सुनिश्चित करते.

निलीमा चितळे/संजना चिटणीस/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2194289)
आगंतुक पटल : 9