संरक्षण मंत्रालय
आत्मनिर्भर भारत: बीईएल आणि सॅफ्रान इलेक्ट्रॉनिक्स आणि डिफेन्स कंपनी यांच्यात भारतात एचएएमएमईआर स्मार्ट प्रिसिजन गाईडेड हवेतून जमिनीवर मारा करणाऱ्या अस्त्राच्या उत्पादनासाठी संयुक्त उपक्रमविषयक सहकार्य करार
Posted On:
24 NOV 2025 10:19PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 24 नोव्हेंबर 2025
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी परिकल्पित केल्यानुसार, मेक-इन-इंडिया आणि आत्मनिर्भर भारत या उपक्रमांना मोठी चालना देत भारत इलेक्ट्रॉनिक्स (बीईएल) आणि फ्रान्सच्या सॅफ्रान इलेक्ट्रॉनिक्स आणि डिफेन्स कंपनी (एसईडी) या कंपनीने भारतात हायली अजाइल मॉड्युलर म्युनिशन एक्सटेंडेड रेंज (एचएएमएमईआर) स्मार्ट प्रिसिजन गाईडेड हवेतून जमिनीवर मारा करणाऱ्या अस्त्राच्या उत्पादनासाठी संयुक्त उपक्रमविषयक सहकार्य करार (जेव्हीसीए) केला आहे.
CS5B.JPG)
एईआरओ इंडिया कार्यक्रमादरम्यान बीईएल आणि एसईडी यांच्यात 11 फेब्रुवारी 2025 रोजी झालेल्या सामंजस्य करारामध्ये व्यक्त करण्यात आलेली इराद्यानुसार या कराराचे औपचारिकीकरण करण्यात आले. दोन्ही कंपन्यांतर्फे संयुक्त उपक्रम कंपनी (जेव्हीसी) उभारण्याचा मानस त्यातून बळकट होतो. ही जेव्हीसी 50:50 भागांच्या भागीदारीत खासगी कंपनी म्हणून स्थापन होईल. ही कंपनी भारतीय हवाई दल तसेच भारतीय नौदल यांच्या परिचालनात्मक गरजांनुसार एचएएमएमईआर चे उत्पादन, पुरवठा आणि देखभाल यांची स्थानिक पातळीवर काळजी घेईल. महत्त्वाच्या उप-जुळवणी, इलेक्ट्रॉनिक्स तसेच यांत्रिक भाग स्थानिक पातळीवर उत्पादित करत या साधनाच्या स्वदेशीकरणाचे प्रमाण 60% पर्यंत वाढवत नेण्यात येईल. अंतिम जुळवणी,चाचणी तसेच गुणवत्ता हमीच्या बाबतीत बीईएल नेतृत्व करणार असून टप्प्याटप्प्याने उत्पादनाचे हस्तांतर केले जाईल.
एचएएमएमईआर ही उच्च अचूकता आणि मोड्युलर रचनेसह लढाईत सिध्द झालेली, अचूकता मार्गदर्शित शस्त्र प्रणाली असून ती, राफाएल आणि हलक्या वजनाच्या तेजस या लढाऊविमानासह विविध प्रकारच्या विमानांमध्ये स्वीकारार्ह आहे. हे जेव्हीसीए भारताचा संरक्षण संबंधी औद्योगिक पाया बळकट करण्याची बीईएलची बांधिलकी अधोरेखित करते आणि स्मार्ट अचूकतेसह मार्गदर्शित हवेतून जमिनीवर मारा करणाऱ्या अस्त्राच्या उत्पादनातील एसईडीचा व्यापक अनुभवाचा वापर करण्याचे उद्दिष्ट ठेवते.
निलीमा चितळे/संजना चिटणीस/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2193870)
Visitor Counter : 4