अल्पसंख्यांक मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

2026 च्या हज यात्रेची तयारी वाढवण्यासाठी हज समितीने दिवसभराची परिषद केली आयोजित


संपूर्ण डिजिटल परिवर्तन, आर्थिक पारदर्शकता आणि सुधारित यात्रेकरू सेवांवर लक्ष केंद्रित करणार

प्रविष्टि तिथि: 22 NOV 2025 6:16PM by PIB Mumbai

नवी दिल्ली , 22 नोव्हेंबर 2025

हज कमिटी ऑफ इंडिया (एचसीओआय) ने आज हज-2026 साठी भारतीय हज यात्रेकरूंचा अनुभव अधिक सुलभ आणि वर्धित करण्यासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजनांवर चर्चा करण्यासाठी एक दिवसाची राष्ट्रीय परिषद आयोजित केली होती. ही बैठक अल्पसंख्याक व्यवहार मंत्रालयाचे (एम ओएम ए) सचिव डॉ. चंद्रशेखर कुमार यांच्या अध्यक्षतेखाली झाली.

17 नोव्हेंबर रोजी मदीना येथे झालेल्या दुःखद बस अपघातात मृत्युमुखी पडलेल्या यात्रेकरूंच्या स्मृतीप्रित्यर्थ दोन मिनिटे मौन पाळून परिषदेची सुरुवात झाली.

आपल्या भाषणात सचिव डॉ. कुमार यांनी एचसीओआयला निर्देश दिले की हजशी संबंधित सर्व कामकाज पूर्णपणे डिजिटल, पोर्टल-आधारित आणि एआय-इंटिग्रेटेड व्हावे ज्यामुळे मॅन्युअल प्रक्रियेची गरज कमी होईल. त्यांनी यावर भर दिला की प्रगत तंत्रज्ञानाच्या युगात कार्यक्षम आणि पारदर्शक सेवा प्रदान करणे याला प्राधान्य असले पाहिजे.

यात्रेकरूंना अर्ज करण्याच्या टप्प्यापासून ते हजनंतरच्या सेवांपर्यंत मदत करण्यासाठी माहिती, सहाय्य आणि आर्थिक व्यवहार यांची निरंतर उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी मजबूत डिजिटल प्रणालींची आवश्यकता डॉ. कुमार यांनी अधोरेखित केली.

पुढे, डॉ. सीएस कुमार यांनी एचसीओआयला हज यात्रेकरूंना सर्व प्रलंबित देयकांपैकी 75% रक्कम तात्काळ परत करण्याचे निर्देश दिले, उर्वरित 25% रक्कमेवर पडताळणी, योग्य तपासणी आणि लेखापरीक्षणानंतर प्रक्रिया केली जाईल. त्यांनी समितीला लेखा प्रक्रिया हाताळण्यासाठी तसेच यात्रेकरूंना 24×7 स्वयं-सहाय्यित आर्थिक व्यवहार सहाय्य उपलब्ध करण्यासाठी व्यावसायिक वित्तीय व्यवस्थापन सेवा (एफएमएस) कंपनीची नियुक्ती करण्याचा सल्ला दिला, ज्यामुळे पारदर्शकता आणि उत्तरदायित्व यासाठी सरकारची वचनबद्धता बळकट होईल. 

एचसीओआयचे सीईओ शनावास सी यांनी मंत्रालयाला आश्वासन दिले की हज यात्रा मागील वर्षांपेक्षा अधिक सुरळीत, अधिक कार्यक्षम आणि अधिक यात्रेकरू-अनुकूल करण्याच्या दृष्टीने आवश्यक त्या सर्व उपाययोजना समिती करेल. अलीकडेच केएसएला भेट देणारे सहसचिव राम सिंग यांनी हज यात्रा सुलभ करण्यासाठी आपली मते मांडली.

विविध राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील हज समित्यांच्या प्रतिनिधींनी प्रत्यक्ष माहिती सामायिक केली आणि अलिकडच्या काळात यात्रेकरूंना भेडसावणाऱ्या अनेक समस्या मांडल्या.

प्रमुख समस्यांमध्ये यांचा समावेश होता:

  • प्रवास बिंदूंपर्यंतचे दीर्घ प्रवास अंतर
  • वृद्ध आणि विशेष दिव्यांग यात्रेकरूंसाठी प्रवेशयोग्यतेचे आव्हान

हज-2026 साठी चांगल्या सुविधा, सुधारित वाहतूक व्यवस्था आणि वर्धित सहाय्य प्रणाली सुनिश्चित करून मंत्रालय आणि संबंधित भागधारकांशी सल्लामसलत करून या समस्या सोडवल्या जातील, असे आश्वासन एचसीओआयने दिले. अल्पसंख्याक व्यवहार मंत्रालय आणि हज समितीने सर्व भारतीय नागरिकांसाठी सुरक्षित, सुव्यवस्थित आणि यात्रेकरू-केंद्रित हज प्रवास सुनिश्चित करण्यासाठी आपल्या वचनबद्धतेची पुष्टी केली आहे.

गोपाळ चिपलकट्टी/नंदिनी मथुरे/प्रिती मालंडकर

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(रिलीज़ आईडी: 2192930) आगंतुक पटल : 4
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी