कंपनी व्यवहार मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

समन्स आणि नोटिसांचा गैरवापर रोखण्यासाठी ‘एसएफआयओ’तर्फे सुरक्षा उपाययोजना


क्यूआर कोडसह ‘डिजिटली जनरेट’ केल्या जाणार सूचना

Posted On: 21 NOV 2025 8:15PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 21 नोव्हेंबर 2025

कंपनी कायदा, 2013 अंतर्गत स्थापन झालेले गंभीर फसवणूक तपास कार्यालय (एसएफआयओ) कंपनी कायद्याच्या कलम 212 अंतर्गत नियुक्त केलेल्या क्लिष्ट प्रकारातील कॉर्पोरेट फसवणुकीची चौकशी करते आणि त्यांच्यावर खटला चालवते.

चौकशी दरम्यान, कंपनी कायदा, 2013च्या कलम 217च्या तरतुदींनुसार गंभीर फसवणूक तपास कार्यालय (एसएफआयओ) कडून समन्स/नोटिस जारी केले जातात.

या संदर्भात,समन्स/सूचनांचा तोतयागिरी किंवा गैरवापर रोखण्यासाठी ‘एसएफआयओ ने खालील तांत्रिक आणि प्रक्रियात्मक सुरक्षा उपाय विषयक यंत्रणेची स्थापना केली आहे.

एसएफआयओ द्वारे जारी केलेले समन्स/सूचना डिजिटल पद्धतीने जनरेट केल्या जातील आणि त्यात क्युआर कोड आणि एक दस्तऐवज ओळख क्रमांक (डीआयएन) घातलेला असतो. काही अगदी  अपवादात्मक परिस्थिती वगळता एसएफआयओच्या अधिकाऱ्यांना फक्त डिजिटल पद्धतीने जनरेट केलेले समन्स/सूचना जारी करण्याचे बंधन आहे.

प्राप्तकर्त्याला प्राप्त झालेल्या पत्रव्यवहाराची सत्यता त्वरित पडताळण्यास मदत करण्यासाठी एसएफआयओ द्वारे जारी केलेल्या समन्स/सूचनांची ऑनलाइन पडताळणी करण्याची प्रणाली अस्तित्वात आहे.

नागरिकांना मिळणारा कोणताही संवाद खरा आहे याची तात्काळ खात्री करण्यासाठी आणि तोतयागिरी किंवा गैरवापर रोखण्यासाठी या पडताळणी प्रणाली स्थापन करण्यात आल्या आहेत. शिवाय,  समन्स आणि नोटिस जारी करण्यावर देखरेख करण्यासाठी ‘एसएफआयओ मध्ये एक पारदर्शक बहु-स्तरीय पुनरावलोकन यंत्रणा यापूर्वीच अस्तित्वात आहे.

सुवर्णा बेडेकर/हेमांगी कुलकर्णी/प्रिती मालंडकर

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 

 


(Release ID: 2192703) Visitor Counter : 3