संरक्षण मंत्रालय
संरक्षण संशोधन आणि विकासात सहकार्य वाढवण्यासाठी डीआरडीओ आणि डीजीए, फ्रान्स यांच्यात तांत्रिक करार
Posted On:
20 NOV 2025 6:27PM by PIB Mumbai
नवी दिल्ली , 20 नोव्हेंबर 2025
संरक्षण संशोधन आणि विकास संघटना (डीआरडीओ) आणि शस्त्रास्त्र महासंचालनालय (डीजीए), फ्रान्स यांच्यात संरक्षण संशोधन आणि विकासात सहकार्य वाढवण्यासाठी एक तांत्रिक करार करण्यात आला आहे. संरक्षण संशोधन आणि विकास विभागाचे सचिव आणि डीआरडीओचे अध्यक्ष डॉ. समीर व्ही कामत आणि राष्ट्रीय शस्त्रास्त्र संचालक, डीजीए, फ्रान्स लेफ्टनंट जनरल गेल डियाझ डी टुएस्टा यांनी 20 नोव्हेंबर 2025 रोजी नवी दिल्लीतील डीआरडीओ भवन येथे या करारावर स्वाक्षरी केली.
IFKU.JPEG)
भविष्यातील संरक्षण आव्हानांच्या दृष्टीने नाविन्यपूर्ण उपाय विकसित करण्यासाठी दोन्ही राष्ट्रे/संस्थांच्या एकत्रित कौशल्याचा आणि संसाधनांचा वापर करणे हे या धोरणात्मक भागीदारीचे उद्दिष्ट आहे. यामुळे संरक्षण संशोधन आणि विकासातील कौशल्य तसेच ज्ञान वाढविण्यासाठी संयुक्त संशोधन आणि प्रशिक्षण कार्यक्रम, चाचणी उपक्रम, माहितीची देवाणघेवाण, कार्यशाळा, चर्चासत्रे इत्यादींचे आयोजन करण्यास औपचारिक चौकट उपलब्ध होऊ शकेल.
या करारानुसार दोन्ही देशांना उपकरणे, ज्ञान आणि तंत्रज्ञानाचे हस्तांतरण उपलब्ध असेल. या करारात नमूद केलेल्या सहकार्याच्या प्रमुख क्षेत्रांमध्ये विमानसंबंधित विषयांसाठी मंच, मानवरहित वाहने, संरक्षण अनुप्रयोगांसाठी प्रगत साहित्य, सायबर सुरक्षा, कृत्रिम बुद्धिमत्ता, अवकाश, नेव्हिगेशन, प्रगत प्रणोदन, प्रगत सेन्सर्स, क्वांटम तंत्रज्ञान, पाण्याखालील तंत्रज्ञान आणि परस्पर हिताच्या इतर क्षेत्रांचा समावेश आहे.
हे सहकार्य राष्ट्रीय सुरक्षा आणि जागतिक संरक्षण तंत्रज्ञानाच्या प्रगतीमध्ये महत्त्वपूर्ण योगदान देईल, असा विश्वास उभय देशांनी व्यक्त केला.
निलीमा चितळे/नंदिनी मथुरे/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2192243)
Visitor Counter : 9