आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
कोडेक्स कार्यकारी समितीवर भारताची पुन्हा निवड; सहकार्यपूर्ण जागतिक अन्न प्रशासनासाठी सर्वानुमते अधिकार प्रदान
Posted On:
18 NOV 2025 6:26PM by PIB Mumbai
नवी दिल्ली , 18 नोव्हेंबर 2025
भारताने 48 व्या कोडेक्स अॅलिमेंटेरियस कमिशन (सीएसी48) च्या बैठकीमध्ये महत्त्वपूर्ण यश संपादन करून जागतिक अन्न प्रशासनातील आपले सहकार्यपूर्ण नेतृत्व पुनर्स्थापित केले आहे. कार्यक्षमतेवर, डेटाव्यवस्थापनावर आणि न्याय्य मानकांच्या विकासावर भर देत भारताला कोडेक्स एक्झिक्युटिव्ह कमिटीमध्ये (CCEXEC) आशिया प्रदेशाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी सर्वानुमते पुनर्नियुक्ती मिळाली असून भारताचा कार्यकाळ सीएसी50 (2027) पर्यंत राहणार आहे.
भारतीय प्रतिनिधिमंडळाचे नेतृत्व अन्न सुरक्षा आणि मानके प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी रजित पुनहानी यांनी केले. आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाचे अधिकारी तसेच विविध तांत्रिक तज्ज्ञ संस्थांचे प्रतिनिधी यामध्ये सहभागी होते.

CCEXEC89 सत्रादरम्यान, सदस्य आशिया या नात्याने भारताने कोडेक्स कार्यक्षमता आणि भविष्यातील आव्हानांवर चर्चा करण्यासाठी मोठे योगदान दिले. भारताने, विशेषतः अन्नात मिसळले जाणारे पदार्थ, कीटकनाशकांचे अवशेष, पशुवैद्यकीय औषधे, विश्लेषणाच्या पद्धती आणि अन्नातील दूषित घटकांवरील डेटाबेस अद्ययावत आणि विकसित करण्यावर भर दिला. भारताने कोडेक्स ऑपरेशन्सची कार्यक्षमता सुधारण्यासाठी, विशेषतः दस्तऐवज भाषांतराच्या संदर्भात, कृत्रिम बुद्धिमत्तेसह आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापराला ठोस पाठिंबा दिला.

हे शिष्टमंडळ राष्ट्रीय आणि प्रादेशिक हितांचे रक्षण करण्यासाठी सक्रिय होते. त्यांनी मानके विकसित करताना प्रादेशिक डेटा विचारात घेण्याची आवश्यकता अधोरेखित केली. भारताने अनेक जागतिक मानकांना पुढे नेण्यात त्यांची प्रासंगिकता आणि उपयुक्तता सुनिश्चित करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. दोन्ही मानकांसाठी कार्यरत गटांचे अध्यक्षस्थान असलेल्या कोडेक्स कमिटी ऑन फ्रेश फ्रूट्स अँड व्हेजिटेबल (सीसीएफएफव्ही) ने आठव्या टप्प्यावर ताज्या खजूरांसाठी मानक स्वीकारले, जे जागतिक स्तरावर महत्त्वाच्या या फळासाठी व्यापार पद्धतींमध्ये सुसंवाद साधण्यासाठी आणि उत्पादनाची गुणवत्ता वाढविण्यासाठी महत्त्वपूर्ण मानक आहे.

काजूगरांसाठी मानकांची प्रगती सुनिश्चित करणे ही कृषी व्यापारातील एक मोठी कामगिरी होती.
सर्व सदस्यांसाठी अन्न सुरक्षा, गुणवत्ता आणि निष्पक्ष व्यापाराला प्रोत्साहन देण्यासाठी बहुपक्षीय प्रणालीमध्ये काम करण्याच्या भारताच्या नूतनीकरण वचनबद्धतेसह सत्राचा समारोप झाला.
नितीन फुल्लुके/नंदिनी मथुरे/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2191338)
Visitor Counter : 6