संरक्षण मंत्रालय
यूएसआयतर्फे नवी दिल्लीत तिसरा वार्षिक भारतीय सैन्य वारसा महोत्सव
प्रविष्टि तिथि:
16 NOV 2025 3:02PM by PIB Mumbai
भारतीय संयुक्त संस्था (यूएसआय) यांनी 14-15 नोव्हेंबर 2025 रोजी नवी दिल्लीतील त्यांच्या परिसरामध्ये तिसरा वार्षिक भारतीय सैन्य वारसा महोत्सव (आयएमएचएफ) आयोजित केला. या महोत्सवात वरिष्ठ लष्करी अधिकारी, धोरणकर्ते, राजनैतिक अधिकारी, विद्वान, लेखक, धोरण - विचार संस्था, उद्योग प्रतिनिधी आणि सर्वसामान्य जनतेचा सहभाग होता. महोत्सवाचे उद्घाटन संरक्षण राज्यमंत्री संजय सेठ यांच्या हस्ते आणि चीफ आॅफ डिफेन्स स्टाफ (सीडीएस) जनरल अनिल चौहान यांच्या उपस्थितीत झाले. या महोत्सवाने भारताच्या लष्करी वारशाचे प्रदर्शन करण्याबरोबरच समकालीन सामरिक आणि सुरक्षा विषयांवरील संवादासाठी आणि देशाच्या संरक्षण क्षेत्राला आकार देणाऱ्या उदयोन्मुख कल्पनांना अधोरेखित करण्यासाठी एक उत्साही विचार मंच उपलब्ध करून दिला.
या तिसऱ्या वार्षिक आवृत्तीमध्ये लेफ्टनंट कर्नल आरुल राज (नि.) यांच्या उत्कृष्ट लष्करी चित्रांचे प्रदर्शन आणि काही महत्त्वपूर्ण प्रकाशनांचे लोकार्पण करण्यात आले. यामध्ये कर्नल पी. के. गौतम (नि.) यांचे द सुक्रनिती : स्टेटक्राफ्ट अॅंड वारक्राफ्ट, डाॅ. ए. के. मिश्रा यांचे आॅनर्स अॅंड अॅवार्डस् आॅफ द इंडीयन आर्मड फोर्सेस आणि मेजर जनरल पी. के. गोस्वामी, व्हीएसएम (नि.) यांचे 75 यीअर्स आॅफ इंडीयाज काॅट्रीब्युशन टू यूएन पीसकीपिंग यांचा समावेश होता.
पहिल्या दिवशीच्या सत्रांमध्ये आॅपरेशन सिंदूर: आत्मनिर्भर भारताला गती देणे, भारत विसरलेले युद्ध, भारताच्या रणनीतिक स्वायत्ततेची पायाभरणी, भावी संघर्ष आणि रणनीतिक दृष्टीक्षेत्र, वादग्रस्त फाळणी, तंत्रज्ञान आणि धोरण: भावी युद्धकाळासाठी रूपांतरित होत असलेली युद्धपद्धती आदी विविध विषयांवर चर्चा झाली.
भारतातील महान सैन्य नेते आणि सैन्य प्रणाली, लाटांवर नियंत्रण / समुद्री आव्हानांवर मात, सैन्य चरित्रे, तिबेटवरील संघर्ष , आसामचा आधुनिक प्रवास, बीएसएफ आणि बांगलादेश, शौर्य आणि सन्मान: भारतीय सैन्याचा कालक्रमिक प्रवास, 1965 च्या भारत-पाक युद्धातील धडे या विषयांचा दुसऱ्या दिवशीच्या सत्रांमध्ये आढावा घेण्यात आला. तसेच रायगड येथे वारसा संवर्धन, सशस्त्र दलांतील महिलांबाबत महत्त्वपूर्ण निकाल , आशियाई सामरिक विचार आणि ऐतिहासिक स्मरणासाठी साहित्याचा उपयोग यावरील चर्चाही संपन्न झाली.
***
सुषमा काणे/नितीन गायकवाड/परशुराम कोर
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2190584)
आगंतुक पटल : 23