आदिवासी विकास मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

4थ्या  राष्ट्रीय ईएमआरएस क्रीडा स्पर्धा 2025 मधील समारोप समारंभातील एनईएसटीएस आयुक्तांचे भाषण 

Posted On: 16 NOV 2025 11:44AM by PIB Mumbai

 

4थ्या राष्ट्रीय ईएमआरएस क्रीडा स्पर्धा 2025 चा समारोप सोहळा 15 नोव्हेंबर रोजी राउरकेला येथील बिरसा मुंडा क्रीडा संकुलामध्ये  झाला. या प्रसंगी आदिवासी विद्यार्थ्यांसाठी राष्ट्रीय शिक्षण संस्थेचे (एनईएसटीएस) आयआरएएस अधिकारी आणि आयुक्त अजीत कुमार श्रीवास्तव यांनी ओडिशाचे माननीय मुख्यमंत्री, वरिष्ठ मान्यवर, अधिकारी, मार्गदर्शक आणि देशभरातून आलेल्या विद्यार्थी खेळाडूंच्या उपस्थितीत प्रेरणादायी आणि भविष्याभिमुख भाषण केले.

आयुक्त, एनईएसटीएस यांचे भाषण

मान्यवर आणि सहभागींचे स्वागत करताना, आयुक्तांनी नमूद केले की, ही स्पर्धा मागील पाच दिवसांत सुंदरगड, राउरकेला आणि राजगांगपूर येथे आयोजित करण्यात आली होती, ज्यात 22 राज्यांमधील आणि 1 केंद्रशासित प्रदेशातील 5500 पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. त्यांनी या कार्यक्रमाचे वर्णन केवळ क्रीडा स्पर्धा नसून ओळख, उत्कृष्टता, एकता आणि आकांक्षा यांचा सांस्कृतिक उत्सव म्हणून केले. तसेच त्यांनी सांगितले की, आपली आदिवासी मुले भविष्याची वाट पाहत नाहीत तर ती भविष्य घडवत आहेत.

ईएमआरएस: आदिवासी शिक्षणातील शांत परिवर्तन

आयुक्तांनी एकलव्य आदर्श निवासी शाळांच्या ( इएमआरएस) जलद प्रगतीवर प्रकाश टाकत हे आदिवासी समुदायांसाठी शिक्षण क्षेत्रात परिवर्तन घडवणारी शांत क्रांती असल्याचे म्हटले.

मुख्य मुद्दे:

ईएमआरएसची सुरुवात 199798 मध्ये झाली असून 6 ते 12 वीपर्यंत मुलामुलींना समान संधी देत उच्च दर्जाचे निवासी शिक्षण उपलब्ध करणे हे उद्दिष्ट आहे.

2025 पर्यंत भारत सरकारने 728 इएमआरएस मान्य केले असून ज्या प्रत्येक ब्लॉकमध्ये लक्षणीय आदिवासी लोकसंख्या आहे तिथे किमान एक शाळा उभारण्याचे ध्येय आहे.

सध्या 477 ईएमआरएस कार्यरत असून जवळपास 1.4 लाख विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.

एनईएसटीएस अंतर्गत, प्रत्येक विद्यार्थ्यांवर वार्षिक ₹1.47 लाख अनुदान आणि याशिवाय ₹34,971 अतिरिक्त सहाय्य प्रभावीपणे वापरून शैक्षणिक, क्रीडा आणि सहशालेय उपक्रमांची गुणवत्ता वाढवली जात आहे.

ओडिशा: ईएमआरएस चळवळीचे नेतृत्वकर्ता राज्य

यजमान राज्याच्या योगदानाची दखल घेत आयुक्तांनी नमूद केले:

ओडिशा राज्यात देशातील सर्वाधिक 114 ईएमआरएस मान्य करण्यात आल्या आहेत.

सध्या राज्यातील 17 जिल्ह्यांमध्ये 47 ईएमआरएस कार्यरत असून 12,306 पेक्षा जास्त विद्यार्थी त्यात शिक्षण घेत आहेत.

ओडिशाने 5वा राष्ट्रीय ईएमआरएस सांस्कृतिक महोत्सव (2024) यशस्वीरित्या आयोजन केले होते आणि या वेळीदेखील उत्कृष्ट आणि आदरातीथ्यपूर्ण  आयोजन केले आहे.

4थ्या राष्ट्रीय ईएमआरएस क्रीडा स्पर्धेमधील वैशिष्ट्यपूर्ण कामगिरी

आयुक्तांनी सांगितले की 8 ठिकाणी 22 क्रीडा प्रकारांच्या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धांचे आयोजन करण्यासाठी 7000 पेक्षा जास्त शिक्षक, अधिकारी, स्वयंसेवक आणि सहाय्यक कर्मचारी सहभागी झाले. त्यांनी विद्यार्थी खेळाडूंच्या चिकाटी, शिस्त आणि खिलाडूवृत्तीचे कौतुक केले आणि भविष्यात त्यांच्यातील अनेक विद्यार्थी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताचे प्रतिनिधित्व करू शकतील अशी आशा व्यक्त केली.

कृतज्ञता व्यक्त

आयुक्तांनी खालील प्रति कृतज्ञता व्यक्त केली:

माननीय मुख्यमंत्री, ओडिशा सरकार

भारतीय सरकारचे आदिवासी कार्य मंत्रालय

ओडिशा सरकार, अनुसूचित जमाती व अनुसूचित जाती विकास विभाग

जिल्हा प्रशासन, सुंदरगड

राउरकेला स्टील प्लांट, ओडिशा पर्यटन विकास महामंडळ

क्रीडा प्राधिकरणे, माहिती व जनसंपर्क विभाग, आरोग्य, परिवहन, पोलीस आणि सर्व संबंधित विभाग

इव्हेंट व्यवस्थापन पथके, यूएनडीपी, स्वयंसेवक आणि सहाय्यक कर्मचारी

विद्यार्थ्यांना तयार करणारे आणि मार्गदर्शन करणारे शिक्षक, एस्कॉर्ट संघ आणि क्रीडा मार्गदर्शक

ईएमआरएस विद्यार्थ्यांना संदेश

विद्यार्थ्यांना दिलेल्या मनोगतात आयुक्त म्हणाले:

"तुम्हा प्रत्येकाकडे अपार क्षमता आहे. तुमचा प्रवास तुमच्या गावातून या स्टेडियमपर्यंत येणे हाच  एक मोठा विजय आहे. तुम्ही पूर्वग्रह मोडून आदिवासी तरुणाई भारताचे समावेशक आणि शक्तिशाली भविष्य घडवत आहे हे सिद्ध करत आहात. तुम्ही फक्त सहभागी होत नाही, तुम्ही इतिहास घडवत आहात."

समारोप

क्रीडा स्पर्धेचा समारोप जाहीर करताना आयुक्तांनी सांगितले की ईएमआरएस चळवळ आता एक शक्तिशाली, दृश्यमान आणि आत्मविश्वासपूर्ण परिवर्तनकारी शक्ती बनली आहे. त्यांनी सहभागी सर्व राज्ये, खेळाडू, शाळा, प्रशिक्षक आणि पालकांचे अभिनंदन केले आणि एकता, उत्कृष्टता आणि आकांक्षा यांची भावना पुढे नेण्याचे आवाहन केले.

ते म्हणाले की, एनईएसटीएस आदिवासी युवांसाठी शिक्षण, क्रीडा, नेतृत्व आणि राष्ट्रनिर्मितीमध्ये अधिक संधी उपलब्ध करून देण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील राहील.

***

हर्षल अकुडे/नितीन गायकवाड/परशुराम कोर

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2190531) Visitor Counter : 7