संरक्षण मंत्रालय
सुरूंग शोध आणि निराकरण मोहिमांसाठी संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने अद्ययावत मानव-वाहक स्वयंचलित जलांतर्गत वाहने केली विकसित
Posted On:
14 NOV 2025 5:31PM by PIB Mumbai
संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (डीआरडीओ ) अंतर्गत विशाखापट्टणम इथल्या नौदल विज्ञान आणि तंत्रज्ञान प्रयोगशाळेत (एनएसटीएल ) सुरूंग प्रतिकार मोहिमांसाठी नव्याने विकसित मानव-वाहक स्वयंचलित जलांतर्गत वाहने यशस्वीरीत्या तयार करण्यात आली आहेत. या प्रणालीमध्ये अनेक जलांतर्गत स्वयंचलनी वाहने असून त्यांना साइड स्कॅन सोनार आणि जलांतर्गत कॅमेरे अशी प्राथमिक सामग्री जोडलेली आहे, ज्यामुळे सुरूंगासारखी वाटणारी वस्तू प्रत्यक्ष कालावधीत ओळखणे आणि वर्गीकृत करणे शक्य होते. वाहनावर असलेल्या गहन शिक्षणाधारित लक्ष्य-ओळख अल्गोरिदममुळे स्वयंचलित वर्गीकरण करता येते, त्यामुळे संचालकाचा कार्यभार आणि मोहिमेचा कालावधी लक्षणीयरीत्या कमी होतो.
याशिवाय, मजबूत जलांतर्गत संप्रेषण प्रणाली यात समाविष्ट करण्यात आली आहे, तिच्यामुळे कार्यवाहीदरम्यान विविध वाहनांमधील माहिती-विनिमय सुलभ होतो आणि ती परिस्थितीची अधिक व्यापक जाणीव करून देते.

अलीकडेच नौदल विज्ञान आणि तंत्रज्ञान प्रयोगशाळा/बंदर क्षेत्रात पूर्ण झालेल्या प्रात्यक्षिक चाचण्यांत प्रणालीच्या महत्त्वाच्या तांत्रिक निकषांची आणि निर्णायक मोहिम उद्दिष्टांची यशस्वी पडताळणी झाली आहे. अनेक औद्योगिक भागीदार या प्रणालीचा निर्मिती प्रक्रियेत सहभागी असून, ही प्रणाली पुढील काही महिन्यांत उत्पादनासाठी सज्ज होणार आहे.
संरक्षण संशोधन व विकास विभागाचे सचिव आणि डीआरडीओचे अध्यक्ष डॉ. समीर व्ही. कामत यांनी या वाहनाच्या यशस्वी विकासाबद्दल नौदल विज्ञान आणि तंत्रज्ञान प्रयोगशाळेच्या पथकाचे अभिनंदन केले आहे. हे एक महत्त्वपूर्ण पाऊल असून परस्परसंबद्ध सुरूंग प्रतिकार उपाययोजनेच्या दिशेने मोठी प्रगती असल्याचे त्यांनी नमूद केले. या प्रणालीमुळे नौदलाच्या सुरूंग युद्धसज्जतेसाठी प्रतिसादक्षमता जलद होईल, असेही ते म्हणाले.
***
सोनाली काकडे/निखिलेश चित्रे/परशुराम कोर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2190236)
Visitor Counter : 10