संरक्षण मंत्रालय
आत्मनिर्भर भारत: संरक्षण मंत्रालय आणि भारत डायनॅमिक्स लिमिटेड यांनी टी-90 रणगाड्याच्या मारक क्षमतेत वाढ करण्यासाठी INVAR अँटी-टँक क्षेपणास्त्रांच्या खरेदीसाठी 2,095.70 कोटींच्या करारावर केली स्वाक्षरी
Posted On:
13 NOV 2025 7:05PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 13 नोव्हेंबर 2025
संरक्षण मंत्रालयाने भारत डायनॅमिक्स लिमिटेड सोबत 'बाय (इंडियन)' श्रेणीत 2,095.70 कोटींच्या एकूण खर्चाच्या INVAR अँटी-टँक क्षेपणास्त्रांच्या खरेदीसाठी करार केला आहे. नवी दिल्ली येथील दक्षिण ब्लॉक येथे 13 नोव्हेंबर 2025 रोजी हा करार संरक्षण सचिव राजेश कुमार सिंह यांच्या उपस्थितीत, मंत्रालयातील वरिष्ठ अधिकारी आणि भारत डायनॅमिक्स लिमिटेडच्या प्रतिनिधींनी स्वाक्षरी केली.
INVAR अँटी-टँक क्षेपणास्त्रांच्या खरेदीमुळे भारतीय सैन्याच्या आर्मर्ड रेजिमेंट्सचा मुख्य आधार असलेल्या टी-90 टँकची क्षेपणास्त्रे व मारकतेत वाढ होणार आहे. ही एक प्रगत लेझर-मार्गदर्शित अँटी-टँक क्षेपणास्त्र प्रणाली असून अत्यंत अचूकतेसह लक्ष्यावर हल्ला करण्याची क्षमता वाढवते. ही यंत्रणा मेकॅनाइज्ड ऑपरेशन्सच्या कार्यपद्धतीत बदल घडवून आणेल आणि शत्रु विरुद्ध सामरिक फायदा मिळवून देणार आहे.
संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भरता साध्य करण्यासाठी देशांतर्गत उद्योगांनी विकसित केलेल्या विशिष्ट तंत्रज्ञानासह, संरक्षण सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांच्या विद्यमान कौशल्याचा वापर करून भारतीय सैन्याच्या परिचालन आवश्यकता पूर्ण करण्याचे सरकारचे प्रयत्न ही खरेदी अधोरेखित करते.
* * *
सुषमा काणे/राज दळेकर/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2189812)
Visitor Counter : 10