संरक्षण मंत्रालय
नवी दिल्लीतील भारतीय संयुक्त सेवा संस्था येथे तिसरा भारतीय सैन्य वारसा महोत्सव आयोजित केला जाणार, संरक्षण राज्यमंत्री मुख्य अतिथी म्हणून उपस्थित राहणार
Posted On:
13 NOV 2025 6:22PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 13 नोव्हेंबर 2025
भारतीय संयुक्त सेवा संस्थेच्या (USI )वतीने आयोजित केला जाणारा तिसरा भारतीय सैन्य वारसा महोत्सव 14 आणि 15 नोव्हेंबर 2025 रोजी नवी दिल्लीत होणार आहे. संरक्षण राज्यमंत्री संजय सेठ या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी असतील, ते उपस्थितांना संबोधित करतील. भारताचा संरक्षण वारसा आणि इतिहास या विषयांवरील चर्चेसह राष्ट्रीय सुरक्षा आणि भूराजकीय मुद्दे देखील यावेळी हाताळले जातील. तिन्ही सैन्यदले, प्रशासक आणि राजकीय नेते, शैक्षणिक संस्था आणि विचारवंत, खासगी आणि सार्वजानिक उद्योग तसेच सर्वसामान्य नागरिक यांच्यात बहुहितधारक संवाद आणि सहभागासाठी एक व्यासपीठ म्हणून कार्य करणे हे भारतीय सैन्य वारसा महोत्सवाचे उद्दिष्ट आहे.
भारतीय सैन्य वारसा महोत्सव 2025 मध्ये लेफ्टनंट कर्नल अरुल राज (निवृत्त) यांच्या वैशिष्ट्यपूर्ण लष्करी चित्रांचे प्रदर्शन आणि कर्नल पी के गौतम (निवृत्त) यांचा 'द शुक्रनीति : स्टेटक्राफ्ट अँड वॉरक्राफ्ट' आणि डॉ. ए. के. मिश्रा यांचा 'भारतीय सशस्त्र दलांचे सन्मान आणि पुरस्कार' हे ग्रंथ प्रकाशित केले जाणार आहेत.
याशिवाय भारतीय लष्कराचा समृद्ध इतिहास आणि वारसा याविषयांशी संबंधित प्रसिद्ध साहित्यिकांच्या पुस्तकांवर पॅनल चर्चेचा देखील या कार्यक्रमात समावेश आहे. यामध्ये ‘ऑपरेशन सिंदूर’, ‘द वॉर इंडिया फॉरगॉट’, ‘कॉन्टेस्टेड पार्टिशन्स’, ‘टसल्स ओव्हर तिबेट’, ‘बीएसएफ अँड बांगलादेश’, ‘उद्भव’, ‘टेमिंग द वेव्ह्ज’, ‘मिलिटरी बायोग्राफीज’ आणि ‘टेक्नॉलॉजी अँड स्ट्रॅटेजी ‘अशी सत्रे आयोजित केली जाणार आहेत.
* * *
शैलेश पाटील/भक्ती सोनटक्के/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2189780)
Visitor Counter : 6