वस्त्रोद्योग मंत्रालय
भारताची वस्त्रोद्योग निर्यातीमधील लवचिकता आणि विविधतेचे दर्शन; 111 देशांना केलेल्या निर्यातीत नोंदवली वाढ
प्रविष्टि तिथि:
12 NOV 2025 8:13PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 12 नोव्हेंबर 2025
जागतिक अडचणी आणि प्रमुख बाजारपेठांमध्ये शुल्क-संबंधित आव्हाने असूनही, हस्तशिल्प निर्यातीसह भारताच्या कापड आणि तयार वस्त्रप्रावरणांनी आर्थिक वर्ष 2025-26 च्या पहिल्या सहामाहीत उल्लेखनीय लवचिकता दर्शवली. एप्रिल-सप्टेंबर 2025 दरम्यान भारताच्या कापड, तयार कपडे आणि ‘मेडअप’च्या जागतिक निर्यातीत 2024 च्या याच कालावधीच्या तुलनेत 0.1% अशी किंचित वाढ झाली.
भारताच्या निर्यात बाजारपेठांमध्ये प्रभावी वाढ नोंदविणाऱ्या काही मोठ्या बाजारपेठा म्हणजे यूएई (14.5%), यूके (1.5%), जपान (19.0%), जर्मनी (2.9%), स्पेन (9.0%) आणि फ्रान्स (9.2%) यांचा समावेश होता. दुसरीकडे, उच्च वृद्धीदर नोंदविणाऱ्या इतर बाजारपेठांमध्ये इजिप्त (27%), सौदी अरेबिया (12.5%), हाँगकाँग (69%) इत्यादींचा समावेश आहे.
एकूण 111 बाजारपेठांनी एप्रिल-सप्टेंबर 2025 दरम्यान 8,489.0 दशलक्ष अमेरिकन डॉलर्सचे योगदान दिले, जे मागील वर्षी 7,718.55 दशलक्ष अमेरिकन डॉलर्स होते – टक्केवारीमध्ये ही 10% आणि मूल्यामध्ये ही वाढ 770.3 दशलक्ष अमेरिकन डॉलर्सची दर्शवते.
या वाढीला गती देणारी प्रमुख क्षेत्रे पुढीलप्रमाणे:
- सर्व प्रकारचे तयार कपडे (RMG) - 3.42% वाढ
- ताग - 5.56% वाढ
या कामगिरीमुळे जागतिक अनिश्चिततेला तोंड देताना या क्षेत्राची अनुकूलता आणि स्पर्धात्मकता अधोरेखित होते.
अपारंपरिक बाजारपेठांमध्ये भारताचा निरंतर विस्तार, "मेक इन इंडिया" आणि "आत्मनिर्भर भारत" उपक्रमांतर्गत निर्यात विविधीकरण, मूल्यवर्धन आणि जागतिक बाजारपेठ एकत्रीकरणावरील सरकारचा धोरणात्मक भर याची पुष्टी करतो.
* * *
सुवर्णा बेडेकर/सुषमा काणे/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2189386)
आगंतुक पटल : 56