अर्थ मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

केंद्रीय वित्तीय सेवा विभागातर्फे (डीएफएस) जन समर्थ पोर्टलवर स्टार्ट अप सामायिक अर्ज ‘जर्नी’ अंतर्गत नवीन सुविधा


या सुविधेद्वारे स्टार्ट अप उद्योगांना सार्वजनिक क्षेत्रातील सर्व बँकांतून कर्ज सुविधा मिळण्यासाठी डिजिटल मंच झाला उपलब्ध

Posted On: 12 NOV 2025 6:47PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 12 नोव्हेंबर 2025

 

केंद्रीय अर्थ मंत्रालयाच्या वित्तीय सेवा विभागाने (डीएफएस) नवी दिल्ली येथे आज आयोजित सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या आढावा बैठकीदरम्यान जन समर्थ पोर्टलवर स्टार्ट अप सामायिक अर्ज जर्नी नामक नवी सुविधा सुरु केली आहे. वित्तीय सेवा विभागातील ज्येष्ठ अधिकारी, भारतीय बँक संघटनेचे (आयबीए) अध्यक्ष, सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचे (पीएसबी) व्यवस्थापकीय संचालक तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी, पीएसबीच्या मित्र बँकांचे व्यवस्थापकीय संचालक तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच आयबीएचे ज्येष्ठ अधिकारी यांच्या उपस्थितीत डीएफएस सचिव एम, नागराजू यांनी ‘अॅप’ जारी केले.

हे पोर्टल स्टार्ट अप उद्योगांना सार्वजनिक क्षेत्रातील सर्व बँकांतून कर्ज सुविधा मिळण्यासाठी एकल डिजिटल मंच उपलब्ध करून देते. हा मंच एकात्मिक डिजिटल मार्गाद्वारे स्टार्ट अप्सना कर्जांसाठी अर्ज करणे, ऑफर्सची तुलना करणे आणि त्यांच्या अर्जाचा मागोवा घेणे शक्य करतो.

मॉडेल कर्ज योजनेच्या पाठबळासह, हा उपक्रम उद्योग आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभागांतर्गत स्टार्ट अप्ससाठीच्या पत हमी योजनेतून 20 कोटी रुपयांपर्यंतची कर्जसुविधा देतो. अर्जावरील वेगवान प्रक्रिया आणि अधिक पारदर्शकतेची सुनिश्चिती करत हा मंच पॅन, वस्तू आणि सेवा कर, उद्यम, प्राप्तीकर विवरणपत्रे तसेच कर्ज मंडळे यांसारख्या माहितीच्या स्त्रोतांना एकत्र करतो. महिला उद्योजकांना व्याजावर विशेष सवलत देखील देण्यात आली असून त्यायोगे समावेशकतेत आणखी वाढ होते.

हा मंच म्हणजे विकसित भारत 2047 च्या संकल्पनेशी जुळवून घेत, उद्योजकांना सक्षम करण्याच्या सरकारच्या बांधिलकीला बळकटी देऊन भारताच्या वाढत्या स्टार्ट अप क्षेत्रासाठी सहयोगात्मक, तंत्रज्ञान-प्रेरित परिसंस्था उभारण्याच्या दिशेने टाकलेले मोठे पाऊल ठरले आहे.

पुढील लिंकचा वापर करून स्टार्ट-अप अर्जाचा नमुना मिळवता येईल: https://www.jansamarth.in/business-loan-startup-scheme

 

 

* * *

सुवर्णा बेडेकर/संजना चिटणीस/दर्शना राणे

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2189335) Visitor Counter : 20