आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
औषधांच्या सुरक्षित वापराला प्रोत्साहन देण्यासाठी भारत जागतिक #MedSafetyWeek मोहिमेत झाला सामील
रुग्णांच्या सुरक्षिततेसाठी भारताच्या वचनबद्धतेचा जागतिक #MedSafetyWeek 2025 मोहिमेद्वारे पुनरुच्चार
Posted On:
10 NOV 2025 9:54PM by PIB Mumbai
नवी दिल्ली , 10 नोव्हेंबर 2025
भारतीय राष्ट्रीय समन्वय केंद्र - फार्माकोव्हिजिलेन्स प्रोग्राम ऑफ इंडिया (NCC-PvPI), भारतीय फार्माकोपिया आयोग (आयपीसी) यांनी 3-9 नोव्हेंबर 2025 दरम्यान आयोजित जागतिक #MedSafetyWeek मोहिमेच्या दहाव्या आवृत्तीत जगभरातील 130 भागीदार संस्थांसह भाग घेतला.
याप्रसंगी बोलताना, आयपीसी चे सचिव-सह-वैज्ञानिक संचालक डॉ. व्ही. कलैसेल्वन यांनी सांगितले की, संशोधनातून असे दिसून येते की सर्व औषधांच्या शंकास्पद दुष्परिणामांपैकी केवळ 5-10% जागतिक स्तरावर नोंदवले जातात. याचा अर्थ असा की आपल्याला केवळ हिमनगाचे टोक दिसते आणि त्यामुळे महत्त्वाच्या सुरक्षितता समस्या ओळखण्यास जास्त वेळ लागू शकतो. #MedSafetyWeek द्वारे, आम्ही अधिकाधिक लोकांना त्यांचा अहवाल महत्त्वाचा आहे याची जाणीव करून देण्याचे उद्दिष्ट ठेवतो.
"शंकास्पद दुष्परिणामांची तक्रार करून, आपल्यापैकी प्रत्येकजण औषधे सर्वांसाठी अधिक सुरक्षित बनवण्यास हातभार लावतो. आपण आवाज उठवल्याने इतरांचे संरक्षण होऊ शकते. ही केवळ डॉक्टर, फार्मासिस्ट किंवा नियामकच नाही तर प्रत्येकाची यात भूमिका आहे," असे भारतीय राष्ट्रीय समन्वय केंद्र - फार्माकोव्हिजिलेन्स प्रोग्राम ऑफ इंडियाचे (एनसीसी-पीव्हीपीआय, आयपीसी) वरिष्ठ प्रधान वैज्ञानिक अधिकारी आणि प्रभारी डॉ. जय प्रकाश यांनी सांगितले.
या वर्षीच्या मोहिमेने हा मुख्य संदेश दिला: "औषधांच्या सुरक्षिततेत प्रत्येकाची भूमिका आहे. शंकास्पद दुष्परिणामांची तक्रार करून, आपण सर्वजण सर्वांसाठी औषधे अधिक सुरक्षित बनवण्यास मदत करू शकतो." या उपक्रमाचा उद्देश रुग्ण, कुटुंबे आणि आरोग्यसेवा व्यावसायिकांमध्ये औषधांच्या संशयास्पद दुष्परिणामांची तक्रार करण्याच्या महत्त्वाबद्दल जागरूकता वाढवणे हा होता.
मोहिमेच्या संपूर्ण आठवड्यात, भारतातील व्यक्ती आणि भागधारकांनी समाज माध्यम आणि जनजागृती उपक्रमांद्वारे #MedSafetyWeek च्या संदेशाचा सक्रियपणे प्रचार केला.
पार्श्वभूमी
2016 मध्ये पहिल्यांदा सुरू झालेली #MedSafetyWeek मोहीम, शंकास्पद दुष्परिणामांची तक्रार का, कशी आणि कुठे करावी याबद्दल लोकांना शिक्षित करण्याचा प्रयत्न करते. 2025 मधील आवृत्ती, ही या मोहिमेची दहावी आणि आतापर्यंतची सर्वात मोठी आवृत्ती ठरली, ज्यामध्ये 117 देशांमधील 130 संस्थांनी 60 हून अधिक भाषांमध्ये संदेश प्रसारित केला.
निलीमा चितळे/श्रद्धा मुखेडकर/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2188569)
Visitor Counter : 13