आयुष मंत्रालय
जागतिक आरोग्य संघटनेच्या शिखर परिषदेपूर्वी प्रामाण्य आधारित पारंपरिक चिकित्सेच्या जागतिक प्रयत्नांचे नेतृत्व भारत करत आहे
भारत सखोल संशोधन, जागतिक सहयोग आणि वर्धित गुणवत्ता व सुरक्षितता चौकटींद्वारे पारंपरिक चिकित्सेला सातत्याने पुढे नेत आहे: केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव
Posted On:
10 NOV 2025 7:51PM by PIB Mumbai
नवी दिल्ली , 10 नोव्हेंबर 2025
नवी दिल्ली येथे 17–19 डिसेंबर 2025 दरम्यान, पारंपरिक चिकित्सा या विषयावर जागतिक आरोग्य संघटनेची दुसरी शिखर परिषद होणार आहे. या पार्श्वभूमीवर आयुष मंत्रालयाने जागतिक आरोग्य संघटनेच्या सहयोगाने आज नवी दिल्ली येथे राजदूतांच्या स्वागत समारंभाचे आयोजन केले होते. या उच्चस्तरीय मेळाव्यात राजदूत, उच्चायुक्त आणि राजनैतिक प्रतिनिधींना शिखर परिषदेचे दृष्टिकोन, जागतिक आरोग्य प्रासंगिकता आणि प्रामाण्यावर आधारित पारंपरिक औषधांना पुढे नेण्यासाठी बहुपक्षीय सहकार्याच्या संधींबद्दल अवगत करण्यात आले.
या स्वागत समारंभाला आयुष मंत्रालयाचे केंद्रीय राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) तसेच आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव, आयुष मंत्रालयाचे सचिव वैद्य राजेश कोटेचा आणि परराष्ट्र व्यवहार मंत्रालयातील सचिव (पश्चिम) राजदूत सिबी जॉर्ज उपस्थित होते. आयुष मंत्रालय आणि जागतिक आरोग्य संघटनेचे वरिष्ठ अधिकारी देखील या कार्यक्रमाला उपस्थित होते.
प्रमुख पाहुणे, केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी मेळाव्याला संबोधित केले. "जगभरातील समतापूर्ण, सुलभ आणि प्रामाण्यावर आधारित आरोग्य सेवा प्रणालींच्या आपल्या सामायिक प्रयत्नांमध्ये या शिखर परिषदेचे आयोजन आणखी एक मैलाचा दगड आहे. पारंपरिक औषध हे सांस्कृतिक ओळख, सामुदायिक ज्ञान आणि मानवतेच्या निसर्ग आणि कल्याणाच्या सामूहिक ज्ञानाचे भांडार आहे. जागतिक आरोग्य संघटना आणि जामनगरमधील पारंपरिक चिकित्सा जागतिक आरोग्य केंद्र यांच्यासोबत एकत्रितपणे कार्य करत आम्ही सखोल संशोधन, गुणवत्ता आणि सुरक्षितता मानके वृद्धिंगत करणे आणि पारंपरिक औषधांचे फायदे सर्वांना उपलब्ध होणे सुनिश्चित करण्याचे उद्दिष्ट ठेवतो" असे ते म्हणाले.
वैद्य राजेश कोटेचा यांनीही आपले विचार मांडले. भारत, जागतिक आरोग्य संघटना आणि जागतिक भागीदारांच्या सहयोगाने, मानके बळकट करण्यासाठी, संशोधनाला चालना देण्यासाठी आणि गुणवत्ता हमी सुनिश्चित करण्यासाठी काम करत असल्याचे त्यांनी सांगितले. या जागतिक संवादातून अर्थपूर्ण आंतरराष्ट्रीय सहकार्याला चालना मिळेल, असा विश्वास वाटत असल्याचे त्यांनी सांगितले.







निलीमा चितळे/सोनाली काकडे/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2188534)
Visitor Counter : 19