नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाच्या वतीने नवी दिल्लीतील भारत मंडपम येथे 11–12 नोव्हेंबर रोजी हरित हायड्रोजनवरील आंतरराष्ट्रीय परिषदेचे (ICGH 2025)आयोजन

Posted On: 04 NOV 2025 9:16PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 4 नोव्हेंबर 2025

केंद्र सरकारच्या नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाने  नवी दिल्लीतील भारत मंडपम येथे 11–12 नोव्हेंबर रोजी  हरित हायड्रोजनवरील आंतरराष्ट्रीय परिषदेचे  (ICGH 2025) आयोजन केले आहे. या परिषदेत  नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा तसेच ग्राहक व्यवहार मंत्री  प्रल्हाद जोशी, पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू, अन्न आणि  सार्वजनिक वितरणमंत्री  हरदीप सिंग पुरी आणि विज्ञान आणि  तंत्रज्ञान तसेच पृथ्वी विज्ञान विभागाचे स्वतंत्र प्रभार राज्य मंत्री डॉ. जितेंद्र सिंह सहभागी होणार आहेत.

हरित हायड्रोजनवरील आंतरराष्ट्रीय परिषदेच्या निमित्ताने  केंद्र सरकारचे अधिकारी, तंत्रज्ञ, विद्यार्थी, प्रतिनिधी, उद्योगजगताचे प्रतिनिधी आणि माध्यम तज्ञ एकत्र येतील.  हरित हायड्रोजनचा विकास आणि विविध क्षेत्रांमध्ये त्याचा अवलंब या मुद्द्यांवर या परिषदेत भर दिला जाईल. कार्यक्रमाचे वेळापत्रक आणि नोंदणी तपशील www.icgh.i वर उपलब्ध आहेत.

ही परिषद म्हणजे राष्ट्रीय हरित हायड्रोजन मिशनला गती देऊन त्या दिशेने प्रगती करण्याच्या केंद्र सरकारच्या प्रयत्नांचा एक भाग आहे. संकल्पनाधिष्ठित संवादसत्रे आणि गोलमेज परिषदांनी युक्त या परिषदेचा उद्देश हरित  हायड्रोजन उत्पादनाला चालना देण्यासाठी, पायाभूत सेवा सुविधांचा विस्तार तसेच  मागणीत वाढ करण्यासह  जागतिक सहकार्याला प्रोत्साहन देण्यासाठी व्यावहारिक  मार्गांबद्दलच्या ज्ञानाचा प्रसार करणे, असा आहे. वित्तपुरवठा, प्रमाणन, बंदर सज्जता , कौशल्य विकास आणि तंत्रज्ञानाचे स्थानिकीकरण तसेच विविध भौगोलिक क्षेत्रांमध्ये सुसंगतता यावर लक्ष केंद्रित करणारी सत्रे आयसीजीएच 2025 चे मुख्य आकर्षण असतील.

हरित हायड्रोजन, स्वच्छ, किफायतशीर आणि देशांतर्गत ऊर्जा उत्पादनासाठी भारत करत असलेल्या प्रयत्नांचा एक महत्त्वाचा भाग असल्याचे नवीन आणि नवीकरणीय  ऊर्जा मंत्रालयाचे सचिव तसेच सोलार एनर्जी कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (SECI) चे अध्यक्ष  संतोष कुमार सारंगी या आगामी परिषदेबद्दल बोलताना, म्हणाले. हे क्षेत्र उदयाला येत असून त्यात तंत्रज्ञानाची निवड, किंमतीचे कल, पायाभूत सुविधांची आवश्यकता आणि मागणीची निर्मिती याबाबत स्पष्टता असणे आवश्यक आहे. या परिषदेमुळे केंद्र सरकारचे प्राधान्यक्रम, उद्योग आणि संशोधन यांची सांगड घालणे शक्य होईल ज्यामुळे या मोहिमेअंतर्गत आवश्यक अंमलबजावणी योग्य समन्वित दिशेने होईल.

या परिषदेत नवी आणि नवीकरणीय ऊर्जा, वीज, बंदरे, पोलाद, खत आणि विज्ञान आणि तंत्रज्ञान या मंत्रालयांचे वरिष्ठ प्रतिनिधी सहभागी होतील. आंतरराष्ट्रीय प्रतिनिधीमंडळांमध्ये आंतरराष्ट्रीय अक्षय ऊर्जा संस्था (IRENA), हायड्रोजन युरोप, एच₂ ग्लोबल फाऊंडेशन, कोरिया हायड्रोजन अलायन्स आणि रॉटरडॅम पोर्ट प्राधिकरण यांचाही  समावेश असेल.


शैलेश पाटील/भक्ती सोनटक्के/प्रिती मालंडकर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(Release ID: 2186475) Visitor Counter : 10