कार्मिक, सार्वजनिक तक्रार आणि निवृत्ती वेतन मंत्रालय
केंद्रीय राज्यमंत्री डॉ.जितेंद्र सिंह यांनी "डिजिटल जीवन प्रमाणपत्र " मोहीम 4.0 अंतर्गत 3 नोव्हेंबर 2025 रोजी स्टेट बँक ऑफ इंडियाद्वारा दिल्लीतील एनडीएमसी कन्व्हेन्शन हॉल येथे आयोजित निवृत्तिवेतनधारकांच्या भव्य शिबिराचे केले उद्घाटन
प्रविष्टि तिथि:
03 NOV 2025 10:19PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 3 नोव्हेंबर 2025
सार्वजनिक तक्रार आणि निवृत्तिवेतनधारक विभागाचे राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी "डिजिटल जीवन प्रमाणपत्र " मोहीम 4.0 अंतर्गत 3 नोव्हेंबर 2025 रोजी स्टेट बँक ऑफ इंडियाद्वारा दिल्लीतील एनडीएमसी कन्व्हेन्शन हॉल येथे आयोजित निवृत्तिवेतनधारकांच्या भव्य शिबिराचे उद्घाटन केले आणि निवृत्तिवेतनधारकांना संबोधित केले. त्यांनी निवृत्तिवेतनधारकांना हयातीचा दाखला डिजिटल पद्धतीने सादर करण्याच्या पद्धतींचा परिचय करून दिला आणि निवृत्तिवेतनधारकांच्या डिजिटल सक्षमीकरणासाठी सरकारने हाती घेतलेल्या उपक्रमांची माहिती दिली ज्यामुळे त्यांच्या जीवन सुलभतेत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे आणि वृद्ध/आजारी निवृत्तिवेतनधारकांसाठी मोठी सोय झाली आहे.
देशाच्या दुर्गम भागातील सर्व निवृत्तीवेतनधारकांपर्यंत पोहोचण्याच्या उद्देशाने, निवृत्तीवेतन आणि निवृत्तीवेतनधारक कल्याण विभाग विविध हितधारकांच्या (पेन्शन वितरण बँका, इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक, पेन्शनर्स कल्याण संघटना, दूरसंचार विभाग, रेल्वे, इलेक्ट्रोनिक आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय ) सहकार्याने 1 ते 30 नोव्हेंबर 2025 दरम्यान राष्ट्रव्यापी डीएलसी मोहीम 4.0 राबवत आहे.
भव्य शिबिरादरम्यान, डॉ. जितेंद्र सिंह यांनी काही निवृत्तीवेतनधारकांच्या डिजिटल जीवन प्रमाणपत्र निर्मितीसाठी फेस ऑथेंटिकेशन केले. डिजिटल पद्धतीने जीवन प्रमाणपत्र सादर करण्याची सोय, विशेषतः फेस ऑथेंटिकेशन तंत्र जे जीवन प्रमाणपत्र 'केव्हाही कुठेही' तयार करण्यास सक्षम बनवते आणि जलद आणि सोयीस्करपणे केले जाते यावर या शिबिरात सविस्तर माहिती देण्यात आली.
शिबिरादरम्यान, डॉ. जितेंद्र सिंह यांनी निवृत्तीवेतनधारकांशी संवाद साधला, ज्यांनी निवृत्तीवेतनधारकांच्या सोयीसाठी आणि जीवन सुलभतेसाठी विकसित डिजिटल जीवन प्रमाणपत्र सादर करण्याच्या सुविधेबद्दल अतीव समाधान आणि आनंद व्यक्त केला. फेस ऑथेंटिकेशन तंत्र आमूलाग्र परिवर्तन घडवणारे आहे कारण ते स्मार्ट फोनद्वारे केले जाऊ शकते.
यामुळे निवृत्तीवेतनधारकांना हयातीचा दाखला सादर करणे सोपे होते आणि विशेषतः वृद्ध/आजारी निवृत्तीवेतनधारकांसाठी उपयुक्त आहे कारण त्यांना कोणत्याही बँकेत किंवा पेन्शन वितरण प्राधिकरणाकडे जावे लागत नाही असे मंत्री म्हणाले.





निलीमा चितळे/सुषमा काणे/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2186110)
आगंतुक पटल : 28