भारतीय निवडणूक आयोग
azadi ka amrit mahotsav

बिहारमधील निवडणुका आणि पोट-निवडणुका 2025: जप्त करण्यात आलेली रक्कम आणि इतर वस्तू

Posted On: 03 NOV 2025 9:18PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 3 नोव्हेंबर 2025

 

  1. भारतीय निवडणूक आयोगाने 2025 च्या बिहार विधानसभा निवडणुकांचे आणि 8 विधानसभा मतदारसंघांतील पोटनिवडणुकांचे वेळापत्रक जाहीर केले आहे. निवडणुकीसाठीची आदर्श आचार संहिता (एमसीसी) लागू करण्यासाठी संबंधित सूचनांसह कठोर नियमपालन सुनिश्चित करण्याचे निर्देश निवडणूक आयोगाने राज्य सरकारे तसेच केंद्रशासित प्रदेश प्रशासनांना दिले आहेत.
  2. बिहार राज्यातील निवडणुकांच्या वेळी सी-व्हिजील मंचावर नोंदवलेल्या तक्रारींबाबत 100 मिनिटांच्या आत कारवाई सुरु करण्याची सुनिश्चिती करून घेण्यासाठी राज्यभरात 824 भरारी पथकांची नेमणूक करण्यात आली आहे.
  3. विविध राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये विविध अंमलबजावणी संस्थांनी केलेल्या कारवाईत आज दिनांक 03 नोव्हेंबर, 2025 पर्यंत 9.62 कोटी रुपये रोख, 42.14 कोटी रुपये मूल्याचे (9.6 लाख लिटर) मद्य, 24.61 कोटी रुपये मूल्याचे अंमली पदार्थ, 5.8 कोटी रुपयांचे मौल्यवान धातू आणि 26 कोटी रुपयांच्या इतर प्रलोभनपर वस्तू असा एकूण 108.19  कोटी रुपयांहून अधिक मूल्याचा बेकायदेशीर प्रलोभनवजा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.  
  4. निवडणुकीदरम्यान रोख रक्कम, अंमली पदार्थ, मद्य आणि इतर प्रलोभनपर वस्तूंच्या वाहतुकीवर बारकाईने लक्ष ठेवण्याचे आणि त्यांचा योग्य बंदोबस्त करण्याचे निर्देश आयोगाने सर्व अंमलबजावणी अधिकाऱ्यांना दिले आहेत.
  5. या निर्देशांच्या अंमलबजावणीसाठी तपासणी तसेच निरीक्षणादरम्यान सामान्य नागरिकांची गैरसोय होणार नाही किंवा त्यांना त्रास होणार नाही याची खात्री अंमलबजावणी अधिकाऱ्यांनी करून घ्यावी यावर देखील आयोगाने अधिक भर दिला आहे.
  6. ईसीआयएनईटीवरील सी-व्हिजील अॅपचा वापर करून सामान्य नागरिक/ राजकीय पक्ष एमसीसीच्या उल्लंघनाची तक्रार नोंदवू शकतात.
  7. 1950 या कॉल सेंटर क्रमांकासह तक्रार निवारण प्रणालीची स्थापना करण्यात आली असून सार्वजनिक अथवा राजकीय पक्षाचा कोणताही सदस्य संबंधित डीइओ  अथवा आरओ  यांच्याकडे तक्रार दाखल करू शकतो.ही प्रणाली 24 तास सुरु आहे.

निलीमा चितळे/संजना चिटणीस/प्रिती मालंडकर

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(Release ID: 2186089) Visitor Counter : 12