संरक्षण मंत्रालय
व्हाईस ऍडमिरल गुरुचरण सिंग, एव्हीएसएम, एनएम यांनी स्वीकारला भारतीय नौदलाच्या कार्मिक प्रमुखपदाचा कार्यभार
Posted On:
01 NOV 2025 12:19PM by PIB Mumbai
व्हाईस ऍडमिरल गुरुचरण सिंग, एव्हीएसएम, एनएम यांनी आज 1 नोव्हेंबर 2025 रोजी भारतीय नौदलाच्या कार्मिक प्रमुखपदाचा कार्यभार स्वीकारला. पुण्याच्या खडकवासल्याच्या राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीचे माजी विद्यार्थी असलेले गुरुचरण सिंग 1 जुलै 1990 रोजी भारतीय नौदलात रूजू झाले.
या ध्वजाधिकाऱ्यांनी समुद्रातील आणि किनारपट्टीवरील तैनातीदरम्यान अनेक पदांवर काम केले आहे. तोफखाना आणि क्षेपणास्त्रे यांमधील तज्ज्ञ म्हणून त्यांनी रणजित आणि प्रहार या भारतीय नौदलातील जहाजांवर सेवा बजावली आहे. तीन स्वदेशी बनावटीच्या युद्धनौकांच्या कमिशनिंग क्रूचा भाग बनण्याचा बहुमान त्यांना प्राप्त झाला आहे, ज्यात आयएनएस ब्रह्मपुत्रावर तोफखाना अधिकारी, आयएनएस शिवालिकवर कार्यकारी अधिकारी, आणि आयएनएस कोचीवर कमांडिंग ऑफिसर म्हणून ते कार्यरत होते. त्यांनी आयएनएस विद्युत आणि आयएनएस कुकरीची कमानही सांभाळली आहे.
ते आयएनएस द्रोणाचार्य (तोफखाना शाळा) येथे प्रशिक्षक आणि नौदल युद्ध महाविद्यालय, गोवा येथे डेप्युटी कमांडंट होते. त्यांच्या स्टाफ कार्यकाळात सहायक चीफ ऑफ पर्सोनेल (एचआरडी) आणि नौदल मुख्यालयामध्ये नौदल गुप्तचर संचालनालय तसेच भारतीय नौदल वर्क-अप टीममधील सेवेचा समावेश आहे.
नोव्हेंबर 2022 मध्ये त्यांनी इस्टर्न फ्लीटचे मुख्य ध्वजाधिकारी म्हणून पदभार स्वीकारला. या कार्यकाळात, 'ऑर्डनन्स ऑन टार्गेट' या ध्येयावर लक्ष केंद्रित करून ताफ्याने ऑपरेशनल तयारीचा उच्च वेग कायम ठेवला. जानेवारी 2024 मध्ये व्हाईस ॲडमिरलच्या श्रेणीवर पदोन्नती झाल्यावर, ध्वजाधिकाऱ्यांची कंट्रोलर पर्सनल सर्व्हिसेस म्हणून नियुक्ती करण्यात आली, जिथे कर्मचाऱ्यांच्या आणि नौदल समुदायाच्या कामाच्या परिस्थितीत सुधारणा करण्यासाठी विविध उपक्रम हाती घेण्यात आले. कार्मिक प्रमुख म्हणून पदभार स्वीकारण्यापूर्वी, ध्वजाधिकारी राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी, खडकवासलाचे ते कमांडंट होते.
त्यांना त्यांच्या तुकडीच्या 'एकंदर गुणवत्ता क्रमात प्रथम' राहिल्याबद्दल ऍडमिरल कटारी ट्रॉफीने सन्मानित करण्यात आले होते. त्यांच्या नेतृत्वाखाली, आयएनएस कुकरीला एकूण परिचालनात्मक परिणामकारकता आणि डिसेंबर 2011 मध्ये चाचेगिरी विरोधी यशस्वी ऑपरेशन्ससाठी चीफ ऑफ नेव्हल स्टाफ 'युनिट सायटेशन' प्रदान करण्यात आले. त्यांना एफओसी-इन-सी कमांडेशन (2002), नौसेना मेडल (2020) आणि अति विशिष्ट सेवा मेडल (2024) ने देखील सन्मानित करण्यात आले आहे.
त्यांच्या शैक्षणिक पात्रतेत एमएस्सी आणि एमफिल (संरक्षण आणि धोरणात्मक अभ्यास) समाविष्ट आहे. डीएसएससी वेलिंग्टन येथे स्टाफ कोर्स, नौदल युद्ध महाविद्यालयात हायर कमांड आणि भारतातील एनडीसी कोर्स व्यतिरिक्त, त्यांनी नॅशनल इंटेलिजन्स युनिव्हर्सिटी, वॉशिंग्टन येथे सागरी गुप्तचर कोर्स आणि स्टॉकहोम, स्वीडन येथे युनायटेड नेशन्स स्टाफ ऑफिसर्स कोर्स मध्ये भाग घेतला आहे.
(1)F5YN.jpeg)
(2)VGU8.jpeg)
***
माधुरी पांगे/शैलेश पाटील/परशुराम कोर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2185384)
Visitor Counter : 10