पंतप्रधान कार्यालय
आंध्र प्रदेशातील श्रीकाकुलम इथल्या व्यंकटेश्वर स्वामी मंदिरात चेंगराचेंगरी होऊन झालेल्या जीवितहानीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला शोक
प्रधानमंत्री राष्ट्रीय मदत निधीतून मदतीची घोषणा
Posted On:
01 NOV 2025 1:59PM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आंध्र प्रदेशातील श्रीकाकुलम इथल्या व्यंकटेश्वर स्वामी मंदिरात चेंगराचेंगरी होऊन झालेल्या जीवितहानीबद्दल शोक व्यक्त केला आहे. या दुर्घटनेत जखमी झालेले लोक लवकरात लवकर बरे व्हावेत, अशी प्रार्थनाही पंतप्रधानांनी केली आहे.
पंतप्रधानांनी प्रधानमंत्री राष्ट्रीय मदत निधीतून प्रत्येक मृतांच्या वारसदाराला 2 लाख रुपये आणि जखमींना 50,000 रुपये इतक्या मदतीची घोषणाही केली आहे.
यासंदर्भात पंतप्रधान कार्यालयाने X या समाज माध्यमावर सामायिक केलेला संदेश :
आंध्र प्रदेशातील श्रीकाकुलम इथल्या व्यंकटेश्वर स्वामी मंदिरात झालेल्या चेंगराचेंगरीमुळे दुःख झाले. ज्यांनी आपले निकटवर्तीय आणि प्रियजन गमावले आहेत, त्यांच्यासोबत माझ्या संवेदना आहेत. जखमी लोक लवकर बरे व्हावेत, अशी मी प्रार्थना करतो.
ज्यांनी आपले प्राण गमावले आहेत, त्यांच्या जवळच्या वारसदाराला प्रधानमंत्री राष्ट्रीय मदत निधीतून 2 लाख रुपयांची मदत दिली जाईल. जखमींना 50,000 रुपये दिले जातील, असे @narendramodi यांनी नमूद केले.
“ఆంధ్రప్రదేశ్లోని శ్రీకాకుళంలోగల వెంకటేశ్వర స్వామి ఆలయంలో జరిగిన తొక్కిసలాట అత్యంత బాధాకరం. తమ సన్నిహితులను,కుటుంబసభ్యులను కోల్పోయిన వారికి ప్రగాఢ సంతాపం తెలియజేస్తున్నాను. గాయపడినవారు త్వరగా కోలుకోవాలని ప్రార్థిస్తున్నాను.
ప్రాణాలు కోల్పోయిన వారి బంధువులకు పీఎం ఎన్ ఆర్ ఎఫ్ ద్వారా రూ. 2 లక్షల ఎక్స్గ్రేషియా,గాయపడిన వారికి రూ. 50,000 మంజూరు చేస్తున్నాం: ప్రధాన మంత్రి @narendramodi”
***
माधुरी पांगे/तुषार पवार/परशुराम कोर
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2185266)
Visitor Counter : 10