युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय
केंद्रीय क्रीडा मंत्री डॉ. मनसुख मांडवीय मुंबईत आयोजित राष्ट्रीय फिटनेस आणि वेलनेस कॉन्क्लेव्ह मध्ये प्रमुख सेलिब्रिटींबरोबर तंदुरुस्ती आणि निरामय आरोग्यावर साधणार संवाद
Posted On:
31 OCT 2025 6:52PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 31 ऑक्टोबर 2025
भारतात तंदुरुस्ती आणि निरामय आरोग्याबाबत वाढत्या सजगतेचा उत्सव साजरा करण्यासाठी, मुंबईतील ट्रायडंट हॉटेलमध्ये 1 नोव्हेंबर 2025 रोजी ‘राष्ट्रीय फिटनेस आणि वेलनेस कॉन्क्लेव्ह’, अर्थात राष्ट्रीय तंदुरुस्ती आणि निरामयता संमेलन आयोजित करण्यात आले आहे. या संमेलनाला केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा आणि कामगार आणि रोजगार मंत्री डॉ. मनसुख मांडवीय, केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा राज्यमंत्री रक्षा निखिल खडसे, केंद्रीय क्रीडा सचिव हरी रंजन राव आणि भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या अध्यक्ष पी.टी.उषा आणि इतर मान्यवर उपस्थित राहतील.
या संमेलनाच्या निमित्ताने देशातील क्रीडा, चित्रपट, जीवनशैली आणि आरोग्य क्षेत्रातील मान्यवर एकत्र येणार असून, रोहित शेट्टी, 2012 लंडन ऑलिम्पिक पदक विजेती सायना नेहवाल, क्रिकेट विश्वचषक विजेता हरभजन सिंग, सैयामी खेर, जॅकी भगनानी यांच्यासह फिटनेस आणि चिकाटीचे प्रतीक असलेल्या अनेक प्रमुख व्यक्ती उपस्थित राहतील.
उद्बोधक पॅनेल चर्चा आणि सत्रांमधून, राष्ट्रीय फिटनेस अँड वेलनेस कॉन्क्लेव्ह’, भारताच्या विकसित होत असलेल्या फिटनेस परिसंस्थेवर चर्चा करण्यासाठी, त्याची व्यावसायिक क्षमता, सामाजिक महत्त्व आणि निरोगी भविष्य घडवण्यामध्ये असलेली महत्वाची भूमिका याचा शोध घेण्यासाठी एक प्रमुख व्यासपीठ म्हणून काम करेल.
“ही वेळ वेलनेस आणि फिटनेसच्या व्यवसायाला मजबूत करण्याची आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फिट इंडिया चळवळीची यापूर्वीच सुरुवात केली आहे आणि ती पुढे नेण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र यायला हवे. भारत हा एक तरुण देश आहे, मात्र येथे जीवनशैलीशी निगडीत आजारांचे प्रमाण जास्त आहे. यावर मात करण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र यायला हवे. फिटनेस आणि वेलनेसचे हे मिशन पुढे नेण्यासाठी अनेक आघाडीचे सेलिब्रिटी पुढे आले आहेत, याचा मला आनंद आहे,” असे डॉ. मांडवीय म्हणाले.
तज्ञांच्या माहितीपूर्ण चर्चासत्रांच्या मालिकेत विविध क्षेत्रातील मान्यवर तंदुरुस्ती आणि समग्र आरोग्याच्या कल्याणाचे महत्त्व यावरील आपापले दृष्टिकोन मांडतील. तंदुरुस्ती आणि मनोरंजनाच्या मिलाफावर प्रकाश टाकताना, चित्रपट निर्माते रोहित शेट्टी त्यांच्या वैयक्तिक तंदुरुस्तीच्या प्रवासाचा दृष्टीकोन देखील सामायिक करतील आणि जनतेमध्ये आरोग्य आणि तंदुरुस्तीची संस्कृती वाढवण्यात सिनेमाच्या भूमिकेवर आपले विचार व्यक्त करतील. ऑलिंपिकपटू नेहवाल तिच्या कारकिर्दीच्या शिखरावर असताना तिला तंदुरुस्तीसाठी कराव्या लागलेल्या संघर्षाच्या कथा सांगतील.
“तंदुरुस्ती आणि उत्तम आरोग्य टिकविण्यासाठी प्रसिद्ध व्यक्तींची मते काय आहेत हे जाणून घेण्याची ही एक उत्कृष्ट संधी आहे. शहरांमध्ये असलेल्या व्यायामशाळेत फिटनेस उपकरणे तयार करणाऱ्या उद्योगातील धुरिणांचे याविषयीचे विचार ऐकण्याची ही एक उत्तम संधी आहे. मला आशा आहे, आपली परिसंस्था कसे कार्य करते याबद्दल काही चांगली माहिती यामधून मिळेल,असे" डॉ. मांडविय पुढे म्हणाले.
या परिषदेचा एक महत्त्वाचा भाग, फिट इंडिया चळवळीचे असे उपक्रम आणि टप्पे दाखवेल, ज्यामुळे अधिक स्वास्थ्यपूर्ण, मजबूत आणि अधिक आत्मनिर्भर भारत निर्माण करण्याच्या वचनबद्धतेला बळ मिळेल. देशाच्या फिटनेस मोहिमेमध्ये प्रेरणादायी योगदान देणाऱ्या फिट इंडिया अँबेसेडर आणि फिट इंडिया आयकॉनच्या सत्कार समारंभाने कार्यक्रमाचा समारोप होईल.
* * *
सुषमा काणे/राजश्री आगाशे/संपदा पाटगावकर/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2184813)
Visitor Counter : 7